टाटा मोटर्स बनली देशातील दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता
भारतीय बाजरात अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर करत असतात. अशीच एक आघाडीची कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. कंपनीच्या कार नेहमीच ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत. तसेच बदलत्या वेळेनुसार कंपनीने त्यांच्या कार अपडेट देखील केल्या आहेत. यासोबतच इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर सुद्धा कंपनी भर देतेय.
ग्राहक देखील टाटा मोटर्सच्या कारवर विश्वास ठेवत आहे. म्हणूनच तर कंपनी भारतातील दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता बनली आहे. अलिकडच्या GST सुधारणांनंतर, सप्टेंबर 2025 हा महिना टाटा मोटर्ससाठी महत्वाचा ठरला. कंपनीने प्रवासी वाहन (पीव्ही) विभागात विक्रमी विक्री कामगिरी केली, ज्यामुळे विक्री क्रमवारीत ते दुसऱ्या स्थानावर पोहोचले.
फक्त 2 लाखांमध्ये Maruti Fronx चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट होईल तुमचा! असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब
सप्टेंबर 2025 मध्ये टाटा मोटर्सने एकूण प्रवासी वाहन विक्री 60,097 युनिट्स (इलेक्ट्रिक वाहनांसह) नोंदवली. सप्टेंबर 2024 मध्ये विकल्या गेलेल्या 41,313 युनिट्सच्या तुलनेत ही 47.4% ची मजबूत वाढ दर्शवते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वाहनच्या आकडेवारीनुसार, टाटा मोटर्सने 40,594 युनिट्सच्या विक्रीसह देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनीचे स्थान मिळवले आहे. कंपनीने महिंद्रा (37,015 युनिट्स) आणि ह्युंदाई (35,443 युनिट्स) यासारख्या ऑटो कंपन्यांना मागे टाकले आहे.
इलेक्ट्रिक वाहन (EV): EV विक्रीत सर्वात मोठी उसळी पाहायला मिळाली. या सेगमेंटमध्ये 9,191 युनिट्सची विक्रमी विक्री झाली, जी मागील वर्षाच्या 4,680 युनिट्सच्या तुलनेत 96.4% वाढ दर्शवते. कंपनीसाठी मासिक EV विक्रीचा हा नवा टप्पा ठरला आहे.
Nexon: कॉम्पॅक्ट SUV Nexon ने 22,500 युनिट्सची विक्री केली, जी Tata Motorsच्या कोणत्याही प्रवासी वाहनासाठी आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री आहे.
Royal Enfield च्या बाईक घरी आणायच्या तयारीत? GST कमी झाल्याने ‘या’ बाईक्स झाल्या सर्वात स्वस्त
Harrier आणि Safari: फ्लॅगशिप मॉडेल्स Harrier आणि Safari यांनी देखील आपली आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री नोंदवत या विक्रमी आकड्यात भर घातली.
CNG: EV सोबतच CNG सेगमेंटने देखील जोरदार कामगिरी केली. Q2FY25च्या तुलनेत 105% पेक्षा जास्त वाढ होत, एकूण 17,800 युनिट्सहून अधिक विक्री झाली.
देशांतर्गत PV विक्री 45.3% वाढून 59,667 युनिट्स झाली. तर निर्यातीत कंपनीने आणखी मोठा विक्रम केला! कंपनीने 1,240 युनिट्सची निर्यात केली, जी मागील वर्षाच्या 250 युनिट्सच्या तुलनेत तब्बल 396% वाढली आहे.