फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात स्टायलिश आणि हाय परफॉर्मन्स बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. यातही तरुणांमध्ये Royal Enfield च्या बाईक्सचा एक वेगळाच चाहता वर्ग पाहायला मिळतो. हीच क्रेझ कायम ठेवण्यासाठी कंपनी नेहमीच उत्तम बाईक ऑफर करत असते. नुकतेच GST कमी झाल्याने कंपनीच्या बाईक्सच्या किमतीत मोठी घट झाली आहे.
भारत सरकारने नवीन जीएसटी दरांच्या घोषणेनंतर, 350 सीसी पर्यंतच्या बाईक्सवरील टॅक्स 18% पर्यंत कमी करण्यात आले आहे. Classic, Bullet, Hunter, Meteor और Goan Classic सह रॉयल एनफील्ड बाईक्सच्या 350 सीसी श्रेणीतील सर्व मॉडेल्स पूर्वीपेक्षा लक्षणीयरीत्या स्वस्त झाले आहेत. चला कंपनीच्या सर्वात स्वस्त बाईकबद्दल जाणून घेऊयात.
एनफील्ड गोआन क्लासिक 350 ही कंपनीची सर्वात नवीन आणि स्टायलिश बाईक आहे. जीएसटी कमी झाल्याने या बाईकची किंमत सुमारे 20 हजार रुपयांनी कमी झाली आहे, ज्यामुळे ती पूर्वीपेक्षा अधिक परवडणारी बाईक बनली आहे.
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. यांच्या टॉप-एंड एमराल्ड ग्रीन शेडच्या किमतीत 19,000 रुपयांपेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे. यात 349 सीसी इंजिन आणि आरामदायी एर्गोनॉमिक्स आहेत.
रॉयल एनफील्ड बुलेट 350 मध्ये साधी स्टाईलिंग, सिग्नेचर थंप आणि आरामदायी रायडिंग पोश्चर आहे. या बाईकच्या किमतीत 18000 रुपयांपेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे टॉप-स्पेक ब्लॅक गोल्ड व्हेरिएंट पूर्वीपेक्षा खूपच स्वस्त बनला आहे.
नवीन फीचर्स आणि अपडेट्ससह Mahindra Thar facelift लाँच, किती असेल किंमत?
रॉयल एनफील्ड मेटीओर 350 ही एक क्रूझर बाईक आहे जी हायवेवर आरामदायी प्रवास आणि आरामदायी एर्गोनॉमिक्स देते. याच्या टॉप-ऑफ-द-लाइन सुपरनोव्हा ट्रिमच्या किमतीत 16 हजारांपेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे. शिवाय, अलीकडील कंपनीने 2025 अपडेटमध्ये नवीन रंग आणि फीचर्स आणले आहेत.
रॉयल एनफील्ड हंटर 350 ही या लाइनअपमधील सर्वात परवडणारी आणि कॉम्पॅक्ट बाईक आहे. याची किंमत सुमारे 15 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे, ज्यामुळे ती पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त बनली आहे.