नवीन फीचर्स आणि अपडेट्ससह Mahindra Thar facelift लाँच (फोटो सौजन्य: X.com)
गेली कित्येक वर्ष एसयूव्ही सेगमेंटमध्ये Mahindra आपले वर्चस्व टिकवून आहे. कंपनीने इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील लाँच केल्या आहेत. आता नुकतेच लोकप्रिय ऑफ-रोड एसयूव्ही Thar ची 2025 ची फेसलिफ्ट लाँच करण्यात आली आहे. या नवीन थारमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्यात नवीन फीचर्स, इंटिरिअर आणि एक्सटिरिअर भागांमध्ये असंख्य अपडेट्सचा समावेश आहे. कंपनीने थारच्या काही जुन्या एर्गोनॉमिक्समध्ये देखील सुधारणा केल्या आहेत. 2025 महिंद्रा थार फेसलिफ्टमध्ये कोणती नवीन फीचर्स आणि अपडेट्स आहेत दिले गेले आहेत? याबद्दल जाणून घेऊयात.
Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा
महिंद्रा थार फेसलिफ्टची किंमत व्हेरिएंटनुसार वेगवेगळी आहे. खाली थारच्या किमतीबाबत माहिती दिली आहे.
1.5-litre Diesel RWD
नवीन थार फेसलिफ्ट मध्ये आणखी काही चांगल्या फीचर्सची भर घालण्यात आली आहे. यात रिअर वायपर आणि वॉशर, रिअर एसी व्हेंट्स, फ्रंट आणि रिअरमध्ये Type-C USB पोर्ट्स, तसेच रिअर पार्किंग कॅमेरा यांचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय काही नवीन ॲडिशन्स देण्यात आले आहेत, जसे की रिअर पार्किंग कॅमेरा आणि आधीपासून असलेली सर्व सुरक्षा वैशिष्ट्ये – ड्युअल एअरबॅग्स, ABS, EBD आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) ही कायम ठेवण्यात आले आहेत.






