
1.टोयोटा ग्लान्झा फेसलिफ्ट
टोयोटा ग्लान्झा ही मारुती सुझुकी बलेनोसोबत प्लॅटफॉर्म आणि अनेक यांत्रिक घटक शेअर करणारी प्रीमियम हॅचबॅक आहे. नवीन ग्लान्झा 14 ऑक्टोबर 2026 रोजी सादर होण्याची शक्यता आहे. या अपडेटमध्ये कारच्या डिझाइनसोबत इंजिन आणि फीचर्समध्येही बदल पाहायला मिळू शकतात.
Toyota Land Cruiser300 हायब्रिड आली समोर! 457 PS पॉवरसह दमदार SUV, पेट्रोल V6 इंजिनला रामराम!
नवीन 1.2-लिटर 3-सिलिंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन सध्याच्या 4-सिलिंडर इंजिनची जागा घेण्याची शक्यता आहे. याशिवाय फ्रंट ग्रिल आणि बंपरमध्ये बदल केले जाऊ शकतात. ADAS, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि वायरलेस फोन चार्जरसारखी फीचर्सही मिळण्याची अपेक्षा आहे.
ग्लान्झा फेसलिफ्टनंतर तिच्या किंमतीतही बदल होऊ शकतो. मारुती सुझुकी बलेनो, ह्युंदाई आय20 आणि टाटा अल्ट्रोज यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या या कारला नवीन फीचर्समुळे ग्राहकांसाठी आणखी आकर्षक बनवण्याचा कंपनीचा प्रयत्न असू शकतो.
2.टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट
इनोव्हा हायक्रॉसच्या फेसलिफ्टची एंट्री 2027 च्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. भारतात या मॉडेलच्या टेस्टिंगदरम्यान काही टेस्ट म्यूल्स दिसून आले आहेत. पेटंटमधूनही आगामी डिझाइनशी संबंधित काही संकेत समोर आले आहेत.
नवीन हायक्रॉसमध्ये फ्रंट प्रोफाइलवर मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मोठी ग्रिल, स्लिम हेडलॅम्प्स, अपडेटेड लाइटिंग आणि नवीन बंपर यामुळे कारचा लूक अधिक आधुनिक होऊ शकतो. टोयोटाच्या नव्या मॉडेल्सपासून डिझाइनची प्रेरणा घेतली जाण्याची शक्यता आहे.
फक्त बाहेरील डिझाइनच नाही, तर केबिनमध्येही अपडेट्स मिळू शकतात. डॅशबोर्ड, सीट अपहोल्स्ट्री आणि इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. कारची 3-रो सीटिंग आणि प्रशस्त केबिन कायम राहण्याची अपेक्षा आहे. पेट्रोल आणि स्ट्रॉंग-हायब्रिड पॉवरट्रेनमध्ये मोठा बदल न करता कंपनी डिझाइन, फीचर्स आणि इंटीरियरवर जास्त भर देऊ शकते.