फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार बेस्ट कार ऑफर करत असतात. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या डिस्काउंट देखील ऑफर करत असतात. यातील बहुतांश ऑफर्स या सणासुदीच्या काळात दिल्या जातात. अशीच एक विशेष ऑफर टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून नवरात्रीत दिली जाणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
सणासुदीचा काळ म्हणजेच प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी आनंद, उत्साह आणि नवीन खरेदीसाठी योग्य वेळ. या पार्श्वभूमीवर टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने आपल्या ग्राहकांसाठी दुहेरी आनंद देणारी मोठी घोषणा केली आहे. कार आणि एसयूव्हींवर नुकतीच झालेली GST दरातील कपात आणि त्यासोबतच खास सणासुदीची योजना अशा दोन आकर्षक फायद्यांची जोड देत टोयोटाने भारतीय ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आणली आहे.
देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आता अजूनच स्वस्त! GST कपातीनंतर नवीन किंमत फक्त…
टीकेएमने पश्चिम प्रांतातील ग्राहकांसाठी विशेष मोहिम ‘बाय नाऊ अँड पे इन 2026’ जाहीर केली आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना नवरात्रीच्या खरेदीमध्ये अधिक उत्साहाचा अनुभव घेता येणार आहे. जीएसटी दर कपात आणि टोयोटाची ही फेस्टिव्ह ऑफर मिळून ग्राहकांसाठी त्यांच्या आवडत्या टोयोटा वाहनाची खरेदी अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर ठरणार आहे. यात टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर, टोयोटा ग्लान्झा आणि टोयोटा टायसर यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्सचा समावेश आहे.
जीएसटी दर कपात 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे, तर ‘बाय नाऊ अँड पे इन 2026’ ऑफर ही 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वैध असणार आहे. ही ऑफर फक्त पश्चिम भारतातील अधिकृत टोयोटा डीलरशिपमध्ये उपलब्ध आहे, ज्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि गोवा यांचा समावेश होतो.
ग्राहकांचे ‘अच्छे दिन’ आलेत! नवीन GST च्या दारानंतर ‘ही’ कार झाली डायरेक्ट 1.32 लाख रुपयांनी स्वस्त
ग्राहकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या या मोहिमेतील विशेष वैशिष्ट्यांमध्ये अनेक फायदे समाविष्ट आहेत:
या दुहेरी फायद्यांमुळे ग्राहकांसाठी हा सणासुदीचा काळ केवळ आनंदीच नाही तर त्यांच्या स्वप्नातील टोयोटा वाहन घरात आणण्यासाठी एक परिपूर्ण संधी ठरणार आहे.