
फोटो सौजन्य: Pinterest
टोयोटाच्या पोर्टफोलिओमध्ये Toyota Land Cruiser 300 ही सर्वात कमी विक्री होणारी कार ठरली आहे. गेल्या 6 महिन्यांत या कारच्या फक्त 116 युनिट्स विकल्या गेल्या आणि यापैकी 3 महिन्यांत एक देखील युनिट विकले गेले नाही. म्हणूनच कंपनीने विक्री वाढवण्यासाठी वर्षअखेरीस मोठी सवलत जाहीर केली आहे.
या Land Cruiser 300 वर आता 13.67 लाख रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. ही कंपनीची एक अतिशय आलिशान कार आहे, ज्याच्या एक्स-शोरूम किमती 2.16 कोटी ते 2.25 कोटी रुपयांपर्यंत आहेत.चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
MG Hector मार्केट गाजवणार भाऊ! लाँच होण्याअगोदरच टिझर रिलीज, ‘या’ दिवशी होणार लाँच
टोयोटा LC 300 डिसेंबर 2025 मध्ये भारतातील सर्वोच्च OEM-सपोर्टेड सवलत देत आहे. कंपनी 5 वर्षांची वॉरंटी 517,286 एक्सचेंज/स्क्रॅपेज 50,000 पर्यंत, TFS सबसिडी 750,000 आणि रेफरल 50,000 पर्यंत देत आहे. यामुळे तुम्हाला एकूण फायदा 13,67,200 होतो.
टोयोटा लँड क्रूझर 300 मध्ये मस्क्युलर हुड, टोयोटा लोगोसह ब्लॅक-आउट ग्रिल, गोल हेडलाइट्स आणि डीआरएलसह एलईडी फॉग लाईट्स आहेत. यात चौकोनी खिडक्या, साइड-स्टेपर्स, ब्लॅक फेंडर्स आणि 16-इंच व्हील्स देखील आहेत. एसयूव्हीमध्ये एसी व्हेंट्सभोवती चांदीचे ॲक्सेंट, दोन यूएसबी पोर्ट, सेंटर कन्सोलवर रेट्रो लँड क्रूझर लोगोसह लाकडी डॅशबोर्ड आणि तीन-स्पोक स्टीअरिंग व्हील देखील आहेत.
लँड क्रूझरमध्ये 3.5-लिटर, ट्विन-टर्बो V6 डिझेल इंजिन आहे जे 415 पीएस पॉवर आणि 650 एनएम टॉर्क निर्माण करते. तसेच 3.3-लिटर, ट्विन-टर्बो V6 डिझेल इंजिन आहे जे 309 पीएस पॉवर आणि 700 एनएम टॉर्क निर्माण करते. दोन्ही इंजिन 10-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहेत.
राजकारणातील चाणक्य Sharad Pawar यांच्या Car Collection वर एकदा नजर फिरवाच
तुमच्या शहरावर किंवा डीलरशिपनुसार या डिस्काउंट ऑफर बदलू शकतात. म्हणून, कार खरेदी करण्यापूर्वी कृपया डिस्काउंट संबंधित सर्व डिटेल्स तपासा.