
फोटो सौजन्य: Gemini
ट्रायम्फ भारतीय बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये वाहने विकते. कंपनी लवकरच किंमती वाढवण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार, ट्रायम्फ त्यांच्या बाईक्सच्या किमती कधी वाढवणार? त्याबद्दल जाणून घेऊयात.
शोरुमचा मालक हसत हसत देईल Maruti Suzuki Baleno CNG ची चावी, जाणून घ्या Down Payment आणि EMI
अहवालांनुसार ट्रायम्फ बाईक्सच्या किमतीत किती वाढ होणार आहे, याबाबत सध्या कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, कंपनीकडून 1 जानेवारी 2026 पासून नवीन किमती लागू केल्या जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ट्रायम्फकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नव्या वर्षापासून किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी दरांमध्ये झालेल्या बदलांनंतर तसेच उत्पादनासाठी लागणाऱ्या इनपुट खर्चात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे ही किंमतवाढ करण्यात येणार आहे.
निर्मात्याच्या माहितीनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये जीएसटी दरांमध्ये बदल करण्यात आला असतानाही कंपनीने 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक्सच्या किमतीत कोणताही बदल केला नव्हता.
‘या’ चिनी टेक कंपनीच्या इनोव्हेशनला मानला बॉस! डेव्हलप केली अशी बॅटरी जी देईल 3000 किमी रेंज
ट्रायम्फ भारतात अनेक सेगमेंटमध्ये मोटारसायकली विकते. उत्पादकाच्या श्रेणीमध्ये Speed 400, Scrambler 400, Trident 660, Daytona 660, Speed Twin 900, Scrambler 900, Street Triple 765 R, Street Triple 765 RS, Bonneville T100, Bonneville T120 Black, Bonneville T120, Bonneville Bobber, Bonneville Speedmaster, Speed Twin 1200, Tiger 1200 Rally Explorer, Rocket 3 Storm R, Rocket 3 Storm GT, Scrambler 1200 X, Speed Triple 1200 RS, यासारख्या बाईक्सचा समावेश आहे. जानेवारीपासून कंपनी त्यांच्या किमतींमध्ये सुधारणा करू शकतात.
`