फोटो सौजन्य: @MCNnews (X.com)
भारतीय बाजारात ऑफ रोडींग बाईकला नेहमीच चांगली मागणी मिळते. या बाईकची किंमत जरी थोडी जास्त असली तरी परफॉर्मन्सच्या बाबतीत ही नेहमीच वरचढ ठरत असते. भारतात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट ऑफ रोडींग बाईक ऑफर करत आहे. Triumph Scrambler 400 XC ही त्यातीलच एक बाईक. मात्र, आता या बाईकच्या किमतीत वाढ झाली आहे.
Triumph Scrambler 400 XC ऑफ-रोड ॲडव्हेंचरसाठी अपडेट करणे महाग झाले आहे. त्याच्या ट्यूबलेस टायर्सची किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्याच्या अपग्रेडची किंमत पूर्वीपेक्षा खूपच जास्त आहे, परंतु ऑफ-रोड अनुभवासाठी ही बाईक उत्तम असेल. चला जाणून घेऊया त्याच्या ट्यूबलेस टायर्सची किंमत किती वाढली आहे आणि यामुळे तुम्हाला कोणते फायदे मिळणार आहे?
फुल्ल टॅंकवर 500 KM रेंज ! 15 हजार पगार असणाऱ्या व्यक्तीच्याही बजेटमध्ये बसेल ‘ही’ बाईक
ट्रायम्फने क्रॉस-स्पोक व्हील्सची किंमत 71,751 रुपये ठेवली आहे. पुढच्या व्हीलची किंमत 34,876 रुपये आणि मागच्या व्हीलची किंमत 36,875 रुपये आहे. ज्यांना त्यांची Scrambler 400 XC ऑफ-रोडिंगसाठी चांगली बनवायची आहे त्यांच्यासाठी ही बाईक अपग्रेड करण्यात आली आहे. या व्हील्सचे ॲक्सेसरीज म्हणून दिली जातात, बाईकची किंमत पूर्वीसारखीच आहे, एक्स-शोरूम 2.95 लाख रुपये.
क्रॉस-स्पोक व्हील्स ऑफ-रोड परफॉर्मन्स मोठ्या प्रमाणात सुधारण्याचे काम करतात. यामुळे बाईकला एक क्लासिक आणि मजबूत लूक देखील मिळतो. स्क्रॅम्बलर 400 एक्ससी भारतीय बाजारात कास्ट ॲल्युमिनियम अलॉय व्हील्ससह (समोर 19-इंच आणि मागील बाजूस 17-इंच) उपलब्ध आहे.
मुलाने वडिलांना दिलं सरप्राईझ ! खास Birth Date असणारी Royal Enfield दिली भेट
या बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत. यात गोल एलईडी हेडलाइट, स्प्लिट-सीट सेटअप, रफ आणि टफ मेटल बॅश-प्लेट आहे. यासोबतच, डिजिटल-अॅनालॉग कन्सोल उपलब्ध आहे, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतो. यात ऑफ-रोड मोडसह ड्युअल-चॅनेल एबीएस आहे. त्याचा मागील एबीएस बंद करता येतो. तसेच, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम देखील देण्यात आला आहे.
बाईकमध्ये 398.15 सीसी, लिक्विड-कूल्ड इंजिन वापरले आहे. त्याचे इंजिन 40 पीएस पॉवर आणि 37.5 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.