फोटो सौजन्य: dr.gaurav_10 (Instagram)
वडील आणि मुलांचं नातं हे नेहमीच खूप स्पेशल असतं. जसं एखाद्या फुलाला उमलण्यास वेळ लागतो, तसंच वडील-मुलाचं नातं उमलण्यास काही वर्षांचा वेळ लागतो. लहान असताना ‘बाप’ शब्द समजतो, मात्र आपण मोठे झाल्यावरच त्या शब्दाचा खरा अर्थ कळतो. अनेकदा वडिलांना आपल्या मुलांसाठी कठोर बनावं लागतं, मात्र त्यांच्या कठोरपणात सुद्धा प्रेम असते, ज्याची जाणीव आपला जाणते झाल्यावरच होते.
प्रत्येक मुलांचे स्वप्न असते की त्यांनी आपल्या वडिलांना काहीतरी स्पेशल गिफ्ट द्यावे, जेणेकरून त्यांना ते कायम लक्षात राहावे. तेव्हा तो क्षण देखील खूप खास बनतो. अलिकडेच एका मुलाने त्यांच्या वडिलांना 2.3 लाख रुपयांची नवीन Royal Enfield Meteor 350 बाईक भेट दिली. खास गोष्ट म्हणजे बाईकवर वडिलांची जन्मतारीख असलेली नंबर प्लेट लावण्यात आली होती.
Toyota Hyryder साठी लिमिटेड एडिशन Prestige Package लाँच, खास वैशिष्ट्ये आणि किंमत
हा व्हिडिओ डॉ. गौरव यांच्या इंस्टाग्रामवरील पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक तरुण त्याच्या वडिलांना Royal Enfield Meteor 350 भेट देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये वडील जेवणाच्या टेबलावर बसले आहेत, त्यांच्या हातात एक छोटे गिफ्ट-पॅकेज आहे आणि कुटुंबातील इतर सदस्य जवळच उपस्थित आहेत.
बाईकची चावी मिळाल्यानंतर, मुलाने त्याच्या वडिलांना आणि संपूर्ण कुटुंबाला घराबाहेर बोलावले. ते सर्व बाहेर येताच, तिथे एक झाकलेली बाईक उभी आहे असे दिसते. वडील त्याचे कव्हर काढतात तेव्हा समोर काळ्या रंगाची चमकणारी Royal Enfield Meteor 350 उभी असते. त्यानंतर, सर्वात खास क्षण येतो, जेव्हा वडिलांना बाईकच्या नंबर प्लेटवर “5768” लिहिलेले दिसते, जी त्यांच्या वाढदिवसाची तारीख आहे.
कसा असेल देशाचा फ्युचर ट्रान्सपोर्ट प्लॅन? Nitin Gadkari म्हणतात,”भारताचा प्रवास…
रॉयल एनफील्ड मेटीओर 350 ही एक क्रूझिंग बाईक आहे, जी लांब टूर आणि शहरी वाहतुकीसाठी परिपूर्णपणे डिझाइन केलेली आहे. याची एक्स-शोरूम किंमत 2.08 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंट 2.32 लाख रुपयांपर्यंत जाते. मुलाने त्याच्या वडिलांसाठी निवडलेला व्हेरिएंट स्टेलर ब्लॅक आहे, ज्याची किंमत 2.18 लाख आहे.
या बाईकमध्ये 349 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे 20.2 बीएचपी पॉवर आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात ब्लूटूथ ट्रिपर नेव्हिगेशन पॉड, एलईडी हेडलॅम्प आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखी आधुनिक फीचर्स आहेत.