Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Triumph: लिमिटेड एडिशन ‘Triumph Speed Twin 1200 TFC’  भारतात दाखल; जगभरात फक्त ७५० बाइक्सची होणार विक्री!

ब्रिटीश बाईक उत्पादक कंपनी 'ट्रायम्फ'ने भारतात आपली लिमिटेड एडिशनअसलेली 'स्पीड ट्विन १२०० टीएफसी' ही सुपरबाईक २१ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली आहे. संपूर्ण जगात या बाईकचे केवळ ७५० युनिट्सच विकले जाणार आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 17, 2026 | 07:11 PM
Triumph: लिमिटेड एडिशन ‘Triumph Speed Twin 1200 TFC’  भारतात दाखल; जगभरात फक्त ७५० बाइक्सची होणार विक्री!
Follow Us
Follow Us:

ब्रिटीश बाईक उत्पादक कंपनी ‘ट्रायम्फ’ने आपली अत्यंत खास आणि मर्यादित संख्येत उपलब्ध असणारी ‘स्पीड ट्विन १२०० टीएफसी’ ही मोटरसायकल भारतात लाँच केली आहे. या देखण्या बाईकची भारतात एक्स-शोरूम किंमत तब्बल २१ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जागतिक स्तरावर सादर झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात ही बाईक भारतीय बाजारात आणली गेली आहे. संपूर्ण जगात या बाईकचे केवळ ७५० युनिट्सच विकले जाणार असून, प्रत्येक बाईकवर तिचा एक विशेष अनुक्रमांक दिला जाणार आहे. या अतिशय महागड्या आणि वेगवान बाईकची डिलिव्हरी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे.

Honda ने भारतात लाँच केल्या 4 नवीन दमदार प्रीमियम बाईक्स! पावरफुल इंजिन अन् प्रीमियम लूकने सुसज्ज; जाणून घ्या किंमत

दमदार इंजिन आणि हायटेक तंत्रज्ञान

या बाईकमध्ये १,२०० सीसी क्षमतेचे, लिक्विड-कॉलिंग तंत्रज्ञानावर आधारित दोन सिलेंडरचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन वाहनाला १०५ हॉर्सपॉवरची प्रचंड ताकद देते. गाडीचा आवाज अधिक दमदार व्हावा यासाठी खास डिझाईन केलेले सायलेन्सर बसवण्यात आले आहेत. गिअर बदलणे सुलभ व्हावे म्हणून क्लचचा वापर न करता गिअर बदलण्याची सोय यात आहे. या बाईकचे वजन सर्वसाधारण मॉडेलपेक्षा २ किलोने कमी म्हणजेच २१४ किलो आहे. सुरक्षिततेसाठी यामध्ये कॉर्नरिंग एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोलसारखे आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.

Bike आता विकून टाका! 226 किमी मायलेज देणारी येतेय Scooter; किंमत…

आकर्षक डिझाईन आणि लूक

ही बाईक दिसायला अत्यंत देखणी आणि राजेशाही थाटाची आहे. या मॉडेलसाठी केवळ काळा आणि सोनेरी रंगाचा खास पर्याय देण्यात आला आहे, जो लाईटमध्ये आपले शेड्स बदलतो. बाईकचे मडगार्ड आणि बाजूचे पॅनेल्स वजनाने हलक्या आणि मजबूत कार्बन-फायबरपासून बनवले आहेत. सोन्याचा मुलामा दिल्यासारखी साखळी आणि इतर सुटे भाग या बाईकला अधिक आकर्षक बनवतात. याची सीट हाताने शिवलेली असून त्यासाठी उच्च दर्जाच्या लेदरचा वापर केला गेला आहे.

खास ग्राहकांसाठी विशेष भेट

या बाईकच्या मर्यादित संख्येमुळे ही खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एक विशेष ओळखपत्र दिले जाईल. यासोबतच गाडी झाकण्यासाठी एक ब्रँडेड कव्हर आणि वॉटरप्रूफ सीट कव्हर मोफत दिले जाणार आहे. अतिशय मर्यादित संख्या आणि वेगळे डिझाईन यामुळे ही बाईक खरेदी करणे हा दुचाकीप्रेमींसाठी एक अभिमानाचा क्षण असेल.

Web Title: Triumph speed twin 1200 tfc price features india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Triumph

संबंधित बातम्या

Lexus Car: लॅक्ससची नवीन हायब्रिड Sedan भारतामध्ये दाखल; स्पोर्टी डिझाइन आणि प्रीमियम मेटल फिनिशिंगसह आलिशान लुक!
1

Lexus Car: लॅक्ससची नवीन हायब्रिड Sedan भारतामध्ये दाखल; स्पोर्टी डिझाइन आणि प्रीमियम मेटल फिनिशिंगसह आलिशान लुक!

‘Tesla Model Y L’ चा जलवा! टेस्ला ‘Model X’ बंद! त्याची जागा घेण्यासाठी आली ही ६ सीटर, आरामदायी आणि  प्रशस्त कार!
2

‘Tesla Model Y L’ चा जलवा! टेस्ला ‘Model X’ बंद! त्याची जागा घेण्यासाठी आली ही ६ सीटर, आरामदायी आणि  प्रशस्त कार!

ARAI काय आहे? भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्री साठी ARAI कोणती भूमिका पार पाडते?
3

ARAI काय आहे? भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्री साठी ARAI कोणती भूमिका पार पाडते?

एखादी गाडी रस्त्यावर धावण्यास योग्य आहे हे कोण ठरवते? भारताची क्रॅश टेस्ट रेटिंग देणारी प्रणाली कशी काम करते? जाणून घ्या
4

एखादी गाडी रस्त्यावर धावण्यास योग्य आहे हे कोण ठरवते? भारताची क्रॅश टेस्ट रेटिंग देणारी प्रणाली कशी काम करते? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.