Honda ने भारतात लाँच केल्या 4 नवीन दमदार प्रीमियम बाईक्स! पावरफुल इंजिन अन् प्रीमियम लूकने सुसज्ज; जाणून घ्या किंमत
होंडाने देशात त्यांच्या मिडिल-वेट स्ट्रीट फाइटर बाइक सीबी 750 हॉर्नेटचे ई-क्लच वर्जन लाँच केले आहे. होंडाचे ई-क्लच एक इलेक्ट्रिकल सिस्टिम आहे, ज्यामध्ये दोन इलेक्ट्रिक एक्चुएटर्स देण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रवास अधिक सोपा होता. तसेच यामध्ये मॅन्युअल क्लचचा वापर करण्याची देखील सुविधा मिळते. या बाईकमध्ये 755cc चे पॅरेलल-ट्विन इंजिन आहे, जे 90.5hp ची पावर आणि 75nm चे टॉर्क निर्माण करते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपये आहे. (फोटो सौजन्य – Honda)
होंडाने ऑटो-क्लचची सुविधा आता एक्सएल 750 ट्रान्सल्पमध्ये देखील दिली आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास आणि खडकाळ रस्त्यांमध्ये राइडर्सना अधिक जास्त आराम मिळणार आहे. ही बाईक दोन रंगांत लाँच करण्यात आली आहे, ज्यामध्ये पर्ल डीप मड ग्रे आणि रॉस व्हाईट यांचा समावेश आहे. या एडीव्ही बाईकमध्ये 755cc चे पॅरेलल-ट्विन इंजिन दिले आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 13.20 लाख रुपये आहे.
होंडाने सर्वात खास लीटर-क्लास सुपरस्पोर्ट बाइक सीबीआर 1000आरआर-आर फायरब्लेड एसपी देखील लाँच केली आहे. या बाईकमध्ये 1000cc चे इनलाइन चार-सिलिंडर इंजिन दिले आहेत, जे 215bhp ची पावर आणि 113nm चे टॉर्क निर्माण करतात. या बाईकची एक्स शोरुम किंमत 33.4 लाख रुपये आहे.
होंडाने भारतात एका नवीन गन मेटल ब्लॅक मेटॅलिक रंगात गोल्ड विंग सादर केली आहे. यामध्ये 1833cc चे लिक्विड-कूल्ड, हॉरिजॉंटली अपोज्ड 6-सिलिंडर इंजिन दिले आहे, जे 7-स्पीड DCT गियरबॉक्ससह येतात. या गियरबॉक्समध्ये रिवर्स मोड आणि वॉकिंग स्पीड मोड देखील मिळणार आहे. या बाईकची एक्स शोरुम किंमत 44.3 लाख रुपये आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल विंडस्क्रीन, वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, ॲडव्हान्स्ड ऑडिओ सिस्टीम आणि एअरबॅग्ज यांसारखे अनेक फीचर्स समाविष्ट आहेत.






