(फोटो सौजन्य-AI एआय)
भारतीय स्कूटर बाजारात नेहमीच मायलेज आणि परवडणाऱ्या किमतीला प्राधान्य दिले जाते. यातच सीएनजी पर्यायांच्या आगमनाने वाहन बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलत आहे. होंडा एक्टिवा ही भारतातील सर्वाधिक चालणारी आणि विश्वासाची पेट्रोल स्कूटर राहिली आहे, जी साधारणपणे ५० ते ६० किमी प्रति लिटरपर्यंतचे मायलेज देते. दुसरीकडे, टीव्हीएस कंपनी आपली बहुप्रतिक्षित ‘ज्युपि्टर सीएनजी’ TVS Jupiter CNG बाजारात आणण्याच्या तयारीत आहे, जी मायलेजच्या बाबतीत एक नवीन क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.
मायलेजच्या मुद्द्यावर विचार केला तर, पारंपारिक पेट्रोलवर चालणारी होंडा एक्टिवा तिच्या उत्कृष्ट इंजिन रिफाइनमेंट आणि ५५-६० किमी प्रति लिटर मायलेजसाठी ओळखली जाते. परंतु, सीएनजी तंत्रज्ञानामुळे टीव्हीएस जुपि्टर सीएनजी ही बाजी मारताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीव्हीएस जुपि्टर सीएनजी प्रति किलो सुमारे ८० ते ८४ किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज देण्याची क्षमता ठेवते. यामध्ये सीएनजीसोबतच एक छोटा पेट्रोल टँक देखील दिला जाणार आहे, ज्यामुळे या दोन्हीचा एकत्रित रायडिंग रेंज सुमारे २२६ किलोमीटरपर्यंत पोहोचतो.
सीएनजीचा परतावा आर्थिकदृष्ट्या खूप किफायतशीर ठरतो एकंदरीत परवडतो. पेट्रोलच्या वाढत्या किमतींच्या तुलनेत सीएनजीचा खर्च प्रति किलोमीटर खूपच कमी पडतो. त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी वापरणाऱ्या ग्राहकांसाठी टीव्हीएस जुपि्टर सीएनजीचा मायलेज खर्च मोठ्या प्रमाणावर वाचवणारा ठरेल. होंडा एक्टिवा तिच्या पेट्रोल इंजिनच्या जोरावर आजही उत्तम कामगिरी करत असली, तरी सीएनजीच्या कमी इंधन खर्चानुसार जुपि्टरचे मायलेज आणि ऑपरेटिंग कॉस्ट अधिक आकर्षक ठरते.
थोडक्यात सांगायचे तर, जरी होंडा एक्टिवा विश्वासार्हता आणि ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत आघाडीवर असली, तरी मायलेजच्या थेट तुलनेत टीव्हीएस जुपि्टर सीएनजी आपल्या सीएनजी आणि ड्युअल-फ्यूल पर्यायाच्या प्रभावामुळे वरचढ ठरणार आहे. कमी खर्कात जास्त अंतर कापायचे असल्यास सीएनजी पर्याय नेहमीच फायदेशीर ठरतो.






