TVS Jupiter की Honda Activa, इंजिन, फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत कोणती स्कूटर आहे बेस्ट?
भारतीय बाजारात विविध विभागात वाहनं विकली जातात. यातही दुचाकींची विक्री झपाट्याने वाढताना दिसत आहे. भारतात ज्याप्रमाणे बाईकची विक्री मोठ्या प्रमाणात होते, त्याचप्रमाणे स्कूटरची विक्री देखील नवनवीन उच्चांक गाठत आहे. हीच वाढती मागणी पाहता अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या देशात उत्तम फीचर्स असणाऱ्या स्कूटर उपलब्ध करून देत आहे.
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम स्कूटर उपलब्ध आहे. पण यातही ग्राहकांची पहिली पसंत ही TVS Jupiter आणि Honda अॅक्टिव्हाला जास्त असते. दोन्ही स्कूटर परवडणाऱ्या किमतीत आणि पॉवरफुल इंजिनसह येतात. या दोन्ही स्कूटरचे आपापले फायदे आणि फीचर्स आहेत. म्हणूनच आज आपण इंजिन, परफॉर्मन्स आणि फीचर्सच्या बाबतीत कोणती स्कूटर चांगली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
तापत्या उन्हापासून कारच्या पेंटचा बचाव कसा कराल? ‘या’ सोप्या टिप्स ठेवा लक्षात !
टीव्हीएस ज्युपिटर अलीकडेच एका मोठ्या अपडेटसह लाँच करण्यात आले आहे, ज्यामुळे या बाईकचे डिझाइन पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक आणि आकर्षक दिसू लागली आहे. या स्कूटरचे बॉडी पॅनल्स उत्तम प्रकारे डिझाइन केलेले आहेत.
Honda Activa चे डिझाइन मागील काही वर्षांपासून जशास तसे आहे. जरी, वेळोवेळी या स्कूटरच्या डिझाइनमध्ये किरकोळ बदल झाले असले तरी, तरीही त्याने भारतीय मार्केटमध्ये पूर्वीप्रमाणेच आपली पकड कायम ठेवली आहे.
हे 113.3 सीसी सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिनने सुसज्ज आहे, जे OBD-2B मानके पूर्ण करते. या स्कूटरचे इंजिन 8.02 पीएस पॉवर आणि 9.2 एनएम टॉर्क जनरेट करते. यात TVS iGo असिस्ट फीचर आहे, जे अतिरिक्त 0.6Nm टॉर्क जनरेट करते.
होंडा अॅक्टिव्हामध्ये 109.51 सीसी सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे, जे OBD-2B मानके पूर्ण करते. त्याचे इंजिन 7.8 पीएस पॉवर आणि 9.5 एनएम टॉर्क जनरेट करते.
टीव्हीएस ज्युपिटरमध्ये अतिशय सुव्यवस्थित टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील मोनोशॉक सस्पेंशन सिस्टम दिले गेले आहे. याच्या पुढच्या टायरमध्ये डिस्क आणि मागील टायरमध्ये ड्रम ब्रेक आहे. ज्युपिटरचे कर्ब वजन 106 किलो आहे आणि सीटची उंची ७६५ मिमी आहे.
होंडा अॅक्टिव्हामध्ये टेलिस्कोपिक फोर्क आणि रिअर मोनोशॉक सस्पेंशन आहे. या स्कूटरच्या दोन्ही टायर्समध्ये फक्त ड्रम ब्रेक दिले आहेत. अॅक्टिव्हाचे कर्ब वजन 105 किलो आहे आणि सीटची उंची 765 मिमी आहे.
टीव्हीएस ज्युपिटर एलईडी लाइटिंग आणि एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. तुम्हाला स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देखील मिळते, जी ब्लूटूथ आणि कॉल/एसएमएस अलर्टद्वारे टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देते.
होंडा अॅक्टिव्हामध्ये हॅलोजन इंडिकेटर आणि टेल लाईटसह एलईडी हेडलाइट आहे. यात OBD-2B असणारे 4.2-इंचाचा TFT डिस्प्ले आहे, जो टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि कॉल/एसएमएस अलर्टला सपोर्ट करतो.