फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. पण जेव्हा आपण कार खरेदी करतो तेव्हा आपल्याला समजते की कार विकत घेण्यापेक्षा तिला मेंटेन ठेवणे कठीण असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले. या दिवसात आपण ज्याप्रमाणे आपल्या शरीराची काळजी घेतो, तसेच कारची देखभाल करणे देखील महत्वाचे आहे.
इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात कार जास्त तापली जाते. याचा परिणाम कारच्या पेंटवर देखील पाहायला मिळू शकतो. जसजसा उन्हाळा जवळ येतो तसतसा सूर्यकिरणांचा प्रभाव अधिक तीव्र होतो. एखादे वाहन तापत्या उन्हात जास्त काळ पार्क केल्याने त्याची कंडिशन बिघडू शकते.
काय लूक आहे राव ! Honda ची ‘ही’ स्पोर्ट बाईक नव्या रूपात झाली लाँच
उन्हाळ्यात, तीव्र सूर्यप्रकाशामुळे, कारचा रंग फिकट होऊ शकतो व त्याचा रंग दुसऱ्या कशात बदलू शकतो. उन्हामुळे कारच्या रंगात भेगाही दिसण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आपण अशा ५ टिप्सबद्दल जाणून आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही कारचा रंग खराब होण्यापासून वाचवू शकता.
उन्हाळ्यात कारच्या रंगाचे UV किरणांपासून संरक्षण करण्याचा सर्वात प्रभावी आणि बेसिक मार्ग म्हणजे तुमची कार उन्हात पार्क करण्याऐवजी सावलीत पार्क करणे. जर तुमच्या घरात गॅरेज नसेल तर तुमची कार शेड किंवा झाडाखाली पार्क करा. यामुळे थेट सूर्यप्रकाशापासून तुमच्या कारच्या रंगाचे संरक्षण होते. तसेच यामुळे कारचा रंग बराच काळ टिकून राहतो.
जर तुम्हाला तुमची कार उघड्यावर पार्क करायची असेल तर तिला नक्कीच झाकून ठेवा. जास्त सूर्यप्रकाशाच्या UV किरणांपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही UV प्रोटेक्टिव्ह कव्हर वापरू शकता. हे कव्हर तुमच्या कारचे केवळ UV किरणांपासून संरक्षण करत नाही तर सूर्य आणि धुळीपासून देखील संरक्षण करते.
तुमची कार नियमितपणे वॉश केल्याने त्याची चमक टिकवून ठेवण्यास मदत होतेच, शिवाय तुमच्या कारचे UV किरणांच्या प्रभावापासून संरक्षण देखील होते.
अलिकडे, अनेक वाहन उत्पादक त्यांच्या वाहनांसाठी यूव्ही प्रतिरोधक रंग देत आहेत. यामुळे कारची चमक बराच काळ टिकते. म्हणूनच जेव्हा तुम्ही नवीन कार खरेदी करत असाल किंवा कारला रंगवत असाल तेव्हा UV संरक्षणासह येणारा रंगच निवडा.
तुम्ही कारच्या खिडक्या आणि विंडशील्डवर यूव्ही सेफ्टी फिल्म वापरू शकता. हे केवळ बाहेरील रंगाचे UV किरणांपासून संरक्षण करत नाही तर आतील वातावरण देखील थंड ठेवते. यामुळे कारचा रंग आणि आतील भाग देखील सुरक्षित राहतो.