फोटो सौजन्य: Social Media
भारतात वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात कार विकल्या जातात. यातही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सला ग्राहक अधिक प्राधान्य देत असतात. एसयूव्हीबद्दलची हीच मागणी पाहता, अनेक कार उत्पादक कंपन्या देशात उत्तम एसयूव्ही ऑफर करत आहे. यातील काही एसयूव्ही तर विक्रीचे नवीन टप्पे गाठत आहे. पण मार्केटमध्ये सर्वच एसयूव्हीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय असेही नाही. आज आपण अशाच एका एसयूव्हीबद्दल जाणून घेणार आहोत, जिची विक्री अनेक महिन्यांपासून ढासळत आहे.
भारतीय बाजारात Jeep India एकूण 4 मॉडेल्स विकत आहे. कंपनीचे सर्व मॉडेल्स प्रीमियम आणि लक्झरी आहेत, ज्यामुळे त्याची विक्री खूपच कमी आहे. परंतु, कंपनीने फेब्रुवारी 2025 मध्ये गेल्या 6 महिन्यांतील दुसऱ्यांदा सर्वात कमी विक्री नोंदवली आहे. जीप ग्रँड चेरोकी ही कंपनीच्या विक्री यादीत सर्वात कमी विकली जाणारी कार आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत या कारला फक्त 12 ग्राहकांनी खरेदी केले आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे सप्टेंबर 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत या कारचे एकही युनिट विकले गेले नाही. कंपनी आपली विक्री वाढवण्यासाठी सतत मोठ्या प्रमाणात ग्राहकांना डिस्काउंट देत असते. या महिन्यातही कंपनीच्या कारवर 3 लाख रुपयांची सूट मिळत आहे. याची एक्स-शोरूम किंमत 67.50 लाख रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.
जुन्या मॉडेलपेक्षा या कारमध्ये अधिक शार्प डिझाइन मिळते, ज्यामध्ये स्लिम हेडलाइट्स आणि टेललाइट्स आहेत. जीपची सिग्नेचर 7-स्लॅट ग्रिल आणि ‘जीप’ लोगो कारच्या पुढच्या भागात दिसतो. चौकोनी बॉडी क्लॅडिंग आणि 20-इंच आणि मेटॅलिक अलॉय व्हील्स ग्रँड या कारला एक जबरदस्त आकर्षणाचे केंद्र बनवते. मागील बाजूस, त्याला स्लिम एलईडी टेल लाईट्स आणि क्रोम सराउंडसह मागील विंडशील्ड मिळते.
या एसयूव्हीमध्ये 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे, जे 270 एचपी पॉवर आणि 400 एनएम टॉर्क जनरेट करते. ऑफरोडिंगसाठी, ही कार भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या इतर सर्व एसयूव्हींना मागे टाकते. याचा ग्राउंड क्लीयरन्स 215 मिमी आहे, ज्यामुळे ग्रँड चेरोकी 533 मिमी खोल पाण्यात देखील धावू शकते. जीप ग्रँड चेरोकी सिंगल व्हेरियंट आणि 4 रंगांमध्ये उपलब्ध आहे.
कारच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, ही कार 10.25 -इंचाच्या फ्रंट को-पॅसेंजर टचस्क्रीन डिस्प्लेसह क्लास-लीडिंग टेक्नोलॉजी देते. याशिवाय, यात 10.25 -इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10-इंचाचा हेड-अप डिस्प्ले आणि 10.1-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे. कारमध्ये पहिल्या रांगेत बसलेल्यांसाठी, यात 10-इंचाचा 4K डिस्प्ले आहे. ज्याची बूट स्पेस 1076-लिटर आहे.