फोटो सौजन्य: @Jefferson_MFG (X.com)
भारतीय बाजारात हाय परफॉर्मन्स आणि दमदार लूक असणाऱ्या बाईक्सना जबरदस्त मागणी आहे. विशेषतः रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सना तरुणांमध्ये मोठा क्रेझ आहे. पण आता हा वर्चस्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कारण TVS लवकरच भारतीय बाजारात Norton Bike लाँच करणार आहे. ही बाईक परफॉर्मन्स, डिझाईन आणि प्रीमियम फील यामध्ये रॉयल एन्फिल्डला थेट टक्कर देईल. Norton ही ब्रिटिश ब्रँड असून ती आता TVSच्या माध्यमातून भारतात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एक पॉवरफुल आणि क्लासिक पर्याय मिळणार आहे. आगामी काळात बाईक प्रेमींसाठी ही स्पर्धा अधिक रोमांचक ठरणार आहे.
MG Windsor Pro Vs Tata Curvv EV: फीचर्स, बॅटरी आणि रेंजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
टीव्हीएस मोटर कंपनीने त्यांच्या प्रीमियम बाईक सेगमेंटमध्ये एक मोठी घोषणा केली आहे की 2025 च्या अखेरीस ब्रिटिश ब्रँड नॉर्टन बाईक भारतीय बाजारात लाँच करणार आहे. खरं तर, ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे, कारण अलीकडेच भारत आणि युनायटेड किंग्डममध्ये Free Trade Agreement (FTA) मंजूर झाला आहे. यानुसार, ब्रिटनमध्ये बनवलेल्या बाईक भारतात स्पर्धात्मक किमतीत उपलब्ध करून दिल्या जातील.
2020 मध्ये टीव्हीएसने नॉर्टन बाईक खरेदी केली आणि तेव्हापासून असा अंदाज लावला जात होता की कंपनी प्रीमियम रेट्रो बाइक सेगमेंटमध्ये एंट्री करण्यासाठी या ब्रँडचा वापर करेल. आता हे स्पष्ट झाले आहे की टीव्हीएसच्या नॉर्टन बाईक ऑफर करणार आहे.
टीव्हीएसच्या सध्याच्या योजनांनुसार, नॉर्टन कमांडो 961, V4SV, आणि V4CR सारखे प्रीमियम मॉडेल्स भारतात CBU (Completely Built Unit) मार्गे लाँच केले जातील. या सर्व बाईक आधीच यूकेमध्ये विकल्या जात आहेत. FTA मुळे, या बाइक्सच्या किमती परवडणाऱ्या ठेवता येतील, ज्यामुळे विक्री वाढेलच, शिवाय प्रीमियम सेगमेंटमध्ये टीव्हीएसची ओळखही मजबूत होईल.
आता बिनधास्त बाईक खरेदी करा ! ‘ही’ कंपनी देतेय फ्री वॉरंटी आणि जबरदस्त कॅशबॅक
टीव्हीएसची सर्वात मोठी धोरणात्मक योजना म्हणजे भारतात 300-500 सीसी सेगमेंटमध्ये एक नवीन बाईक रेंज लाँच करणे. ही रेंज टीव्हीएस आणि नॉर्टन यांच्या भागीदारीत विशेषतः भारतीय आणि इतर बाजारपेठांसाठी विकसित केली जात आहे. या रेंजमधील पहिले उत्पादन 300-400 सीसी रेंजचे असेल आणि ते भारतात तयार केले जाईल, ज्यामुळे खर्च कमी होईल आणि स्थानिक बाजारपेठ लक्षात घेऊन परफॉर्मन्स आणि डिझाइनमध्ये सुधारणा होईल.