Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु

टीव्हीएस NTORQ 150 ने नेपाळमध्ये 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटर सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. 13.2 PS पॉवर, 104kph टॉप स्पीड आणि 0-60kph साठी 6.3 सेकंद अशी कामगिरी या स्कूटरला खास बनवते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 27, 2026 | 07:49 PM
नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु
Follow Us
Follow Us:
  • टीव्हीएस NTORQ 150 नेपाळमध्ये 3,69,900 नेपाळी रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे.
  • 149.7cc इंजिन 13.2 PS पॉवर देते आणि स्कूटर 6.3 सेकंदांत 0-60kph वेग पकडते.
  • TCS, ABS आणि 50 पेक्षा जास्त कनेक्टेड फीचर्समुळे NTORQ 150 प्रीमियम स्कूटर सेगमेंटमध्ये दाखल झाली आहे.
टीव्हीएस मोटरने आपल्या प्रीमियम स्कूटर पोर्टफोलिओचा मोठा विस्तार करत नेपाळमध्ये नवीन NTORQ 150 लॉन्च केली आहे. नेपाळी मार्केटमध्ये दाखल होणारी ही पहिली 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटर असल्याचा कंपनीचा दावा आहे. जगदंबा मोटर्सच्या भागीदारीत लॉन्च करण्यात आलेल्या या स्कूटरची सुरुवातीची किंमत NPR 3,69,900 ठेवण्यात आली आहे.

टीव्हीएस NTORQ 150 मध्ये 149.7cc एअर-कूल्ड, O3C टेक्नॉलॉजी असलेले इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 13.2 PS पॉवर आणि 14.2Nm टॉर्क तयार करते. स्कूटरचा टॉप स्पीड 104kph आहे. वर्किंगच्या बाबतीत 0-60kph वेग पकडण्यासाठी फक्त 6.3 सेकंद लागतात. त्यामुळे रोजच्या वापरासोबत वेगवान आणि स्पोर्टी राइडिंगचा एक्सपिरीयंस देण्यावर या मॉडेलचा भर आहे.

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स

सुरक्षेच्या बाबतीतही NTORQ 150 मध्ये जास्त लक्ष देण्यात आले आहे. यात सिंगल-चॅनेल ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम म्हणजेच TCS देण्यात आली आहे. याशिवाय स्विचेबल राइडिंग मोड्स आणि इंटरॅक्टिव्ह असिस्ट सिस्टिम्स मिळतात. प्रीमियम स्कूटर सेगमेंटमध्ये या फीचर्समुळे मॉडेलची टेक्निकल बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कनेक्टेड फीचर्स हे या स्कूटरचे आणखी एक आकर्षण आहे. टीव्हीएस SmartXonnect टेक्नोलॉजीच्या माध्यमातून 50 पेक्षा जास्त कनेक्टेड सुविधा मिळतात. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्स यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे तरुण रायडर्सना लक्षात घेऊन तयार केलेली स्कूटर अशी तिची ओळख निर्माण होते.

Honda QC3 vs TVS iQube, Bajaj Chetak, VIDA VX2 आणि Ather Konarc; फॅमिली, ऑफिस आणि लांब प्रवासासाठी कोणती स्कूटर योग्य?

टीव्हीएसची नेपाळमधील जगदंबा मोटर्ससोबतची पार्टनरशिप 2015 पासून आहे. त्यामुळे देशभरातील विक्री आणि आफ्टर-सेल्स नेटवर्कचा आधार कंपनीला मिळतो. याआधी नेपाळमध्ये टीव्हीएसचा भर 125cc NTORQ सेगमेंटवर होता. आता NTORQ 150च्या माध्यमातून कंपनीने प्रीमियम परफॉर्मन्स स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नेपाळच्या स्पोर्टी स्कूटर मार्केटमध्ये टीव्हीएस, यामाहा आणि होंडा यांच्यातील स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Tvs ntorq 150 launch nepal price features performance auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooters
  • TVS

संबंधित बातम्या

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या
1

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या

यामाहा RD350LC चालवली अन् कळली जुन्या बाइकची खरी ‘फील’ काय असते!
2

यामाहा RD350LC चालवली अन् कळली जुन्या बाइकची खरी ‘फील’ काय असते!

किया क्विक फायनान्स लॉन्च; कार खरेदीसाठी फायनान्स प्रक्रिया होणार आणखी सोपी
3

किया क्विक फायनान्स लॉन्च; कार खरेदीसाठी फायनान्स प्रक्रिया होणार आणखी सोपी

Keeway EZI Hypevolt-R इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करताय? मग नक्की जाणून घ्या हे ३ फायदे आणि २ तोटे
4

Keeway EZI Hypevolt-R इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करताय? मग नक्की जाणून घ्या हे ३ फायदे आणि २ तोटे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.