ज्या किमतीत Iphone लाँच होतात, त्याच किमतीत TVS ने लाँच केली 'ही' दमदार बाईक
भारतीय ग्राहक नेहमीच बाईक खरेदी करताना स्वस्त किमतीत चांगला मायलेज देणारा ऑप्शन निवडत असतो. ग्राहकांच्या याच अपेक्षेनुसार अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बजेट फ्रेंडली बाईक ऑफर करत असतात. TVS देखील मार्केटमध्ये उत्तम किमतीत चांगल्या मायलेज देणाऱ्या बाईक आणि स्कूटर ऑफर करत असतात. नुकतेच कंपनीने एक नवीन बाईक लाँच केली आहे.
टीव्हीएसने त्यांच्या लोकप्रिय कम्युटर बाईक स्पोर्टचा नवीन प्रकार ES+ लाँच केला आहे. राजधानी दिल्लीमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत 60,881 रुपये ठेवण्यात आली आहे. या नवीन बाईकचे सर्वात मोठे फिचर म्हणजे याचा जबरदस्त मायलेज, जो कंपनीच्या मते 65 किमी प्रति लिटरपेक्षा जास्त आहे.
Kia Clavis साठी बुकिंग सुरु? ‘या’ दिवशी भारतात होणार सादर, संभाव्य किंमत असेल…
TVS Sport ES+ विशेषतः अशा ग्राहकांसाठी डिझाइन केले आहे, जे कमी किमतीत जास्त मायलेज आणि स्टाइल शोधत आहेत. याशिवाय, या बाईकमध्ये हिरो स्प्लेंडरला थेट स्पर्धा देण्याची क्षमता आहे. चला या बाईकच्या अन्य बाबींबद्दल जाणून घेऊयात.
टीव्हीएस स्पोर्ट ईएस+ ला नवीन डिझाइन अपडेट देण्यात आले आहे, ज्यामुळे ही बाईक इतर बाईकपेक्षा वेगळे दिसते. यात ग्रे-रेड आणि ब्लॅक-निऑन सारखे आकर्षक रंग पर्याय देण्यात आले आहेत, त्याशिवाय स्पोर्टी अलॉय व्हील्सवर पिनस्ट्रिपिंग देण्यात आले आहे. फक्त ES+ व्हेरियंट उपलब्ध असलेला ब्लॅक पिलियन ग्रॅब रेल तो इतर मॉडेल्सपेक्षा वेगळा बनवतो. तसेच, रंगीत हेडलाइट काऊल आणि मडगार्ड या बाईकला प्रीमियम लूक देतात. या सर्व घटकांमुळे TVS Sport ES+ एक स्टायलिश पर्याय बनतो.
या बाईकच्या इंजिन आणि परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर, TVS Sport ES+ मध्ये 109.7cc सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड इंजिन आहे, जे 8.08 bhp पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. यात 4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील समाविष्ट आहे. ही बाईक जास्तीत जास्त 90 किमी प्रतितास वेग गाठू शकते आणि कंपनीच्या मते, याचे मायलेज 65 किमी प्रति लिटरपेक्षा जास्त आहे. या बाईकचे वजन 112 किलो आहे आणि तिचा ग्राउंड क्लिअरन्स 175 मिमी आहे. त्यात 10 लिटरची फ्युएल टॅंक आहे. पुढील आणि मागील दोन्ही बाजूस ब्रेकिंग सिस्टीम म्हणून ड्रम ब्रेक्स उपलब्ध आहेत.
JSW MG Windsor Pro EV चा नवीन टिझर रिलीज, मिळाली ‘ही’ महत्वाची अपडेट
किंमत आणि व्हेरियंटबद्दल बोलायचे झाले तर, टीव्हीएसने ES+ ला दोन सध्याच्या व्हेरियंटमध्ये स्थान दिले आहे. सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील्सची किंमत 59,881 रुपये आहे आणि सेल्फ स्टार्ट ईएलएस अलॉय व्हील्सची किंमत 71,785 रुपये आहे. अशा परिस्थितीत, ज्यांना थोडे अधिक फीचर्स हवे आहेत पण बजेट कमी आहे अशांसाठी ES+ व्हेरियंट हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.