फोटो सौजन्य: @KiaInd (X.com)
भारतात अनेक वाहन उत्पादक कंपन्या आहेत, ज्या विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. त्यात भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्याप्ती ही खूप मोठी असल्याकारणाने इथे स्वदेशी आणि विदेशी ऑटो कंपन्या नेहमीच भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम कार्स आणि ऑफर देत असतात. यातीलच एक विदेशी कंपनी म्हणजे किया.
भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये वाहने विकणारी उत्पादक कंपनी किया लवकरच एक नवीन कार लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीकडून ही नवीन एसयूव्ही कधी लाँच केली जाईल? त्यात कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले जाऊ शकतात? याची बुकिंग कधी सुरू होऊ शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात.
JSW MG Windsor Pro EV चा नवीन टिझर रिलीज, मिळाली ‘ही’ महत्वाची अपडेट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, किआ क्लॅव्हिससाठी अनधिकृतपणे बुकिंग सुरू करण्यात आली आहे. या कारसाठी काही डीलरशिपवर अनधिकृत बुकिंग घेतले जात आहे. परंतु, कंपनीने अद्याप याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
या कारचा पहिला टीझर काही काळापूर्वी सोशल मीडियावर रिलीज झाला होता. या टीझरमध्ये एक चांदीच्या रंगाची कार दाखवण्यात आली आहे. यासोबतच, त्याच्या फ्रंट लूकची झलक देखील यात उपलब्ध आहे. त्यानुसार किआच्या नवीन 2.0 डिझाइन कारसारखेच असेल. ज्यासोबत ते LED DRL, LED हेडलाइट्ससह येईल. याशिवाय, त्यात ADAS सारखे सेफ्टी फिचर देखील प्रदान केले जातील. कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील दिले जाईल.
येत्या 8 मे रोजी कंपनीकडून ही कार लाँच केली जाणार आहे. काही काळानंतर त्याच्या किंमती देखील जाहीर केल्या जातील.
Kawasaki Bikes वर मिळतेय भरभरून सूट, ‘या’ बाईकवर सर्वाधिक डिस्काउंट
मिळालेल्या माहितीनुसार, ही कार एमपीव्ही सेगमेंटमध्ये लाँच केली जाईल. ही सहा आणि सात सीटर ऑप्शन्ससह देखील ऑफर केली जाईल आणि त्यात अनेक प्रीमियम फीचर्स देखील असतील. या कारची संभाव्य एक्स-शोरूम किंमत सुमारे 15 ते 20 लाख रुपये असू शकते.
कंपनीकडून ही प्रीमियम एमपीव्ही म्हणून लाँच केली जाणार आहे. अशा परिस्थितीत, ही टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि क्रिस्टा सारख्या MPVs तसेच महिंद्रा स्कॉर्पिओ N, XUV 700, MG हेक्टर प्लस, टाटा सफारी सारख्या SUV शी थेट स्पर्धा करेल.