फोटो सौजन्य: @MGMotorIn (X.com)
भारतीय बाजारात आता इलेक्ट्रिक कार्सचा बोलबाला वाढताना दिसत आहे. प्रत्येक ऑटो कंपनी इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करताना दिसत आहे. तसेच मार्केटमध्ये काही इलेक्ट्रिक कार्स इतक्या लोकप्रिय ठरल्या आहेत की रोज त्यांच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे MG Windsor. आता या कारचे अपडेटेड व्हर्जन लवकरच मार्केटमध्ये लाँच होणार आहे.
भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर करणारी ब्रिटिश वाहन निर्माता कंपनी जेएसडब्ल्यू एमजी मोटर्स लवकरच एक नवीन कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. लाँचिंगपूर्वी, निर्मात्याने सोशल मीडियावर एक नवीन टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये कोणत्या प्रकारच्या फीचर्सची माहिती दिली आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Kawasaki Bikes वर मिळतेय भरभरून सूट, ‘या’ बाईकवर सर्वाधिक डिस्काउंट
एमजी मोटर्स लवकरच नवीन कार म्हणून JSW MG Windsor Pro EV लाँच करण्याची तयारी करत आहे. नुकतेच कंपनीने सोशल मीडियावर एक नवीन टीझर रिलीज केला आहे.
सोशल मीडियावर रिलीज झालेल्या नवीन टीझरमध्ये कारच्या सेफ्टी फीचर्सची माहिती देण्यात आली आहे. टीझरनुसार, त्यात Level-2 ADAS दिले जाणार आहे. या टीझरमध्ये या सेफ्टी फीचर्सचा डेमो देखील दाखवण्यात आला आहे.
याआधीही, कंपनीने नवीन कारचा टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारची माहिती देण्यात आली होती.आधी रिलीज झालेल्या टीझरनुसार, सध्याच्या विंडसरचे हे अपडेटेड व्हर्जन असेल. यात उत्तम सेफ्टी फीचर्स, चांगले इंटिरिअर, मोठी बॅटरी आणि उत्तम टेक्नोलॉजी मिळणार आहे.
JSW MG Windsor Pro EV मध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, चांगले लेदरेट अपहोल्स्ट्री, अपग्रेडेड 15.6-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, रिक्लाइन केलेल्या मागील सीट्स, 604 लिटर बूट स्पेस, पॉवर्ड टेलगेट, वायरलेस चार्जिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, LED लाईट्स, कनेक्टेड LED डायल तसेच V2L सारख्या फीचर्ससह येईल.
आपल्याच Wagon R आणि Baleno वर भारी पडली Maruti ची ‘ही’ कार, मार्केटमध्ये पाहायला मिळतेय वेगळीच क्रेझ
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सेफ्टीसाठी त्यात निश्चितच Level-2 ADAS दिले जाईल. यासोबतच, 6 एअरबॅग्ज, ABS, EBD, हिल असिस्ट, 360 डिग्री कॅमेरा, TPMS, ISOFIX चाइल्ड अँकरेज सारखी अनेक फीचर्स देखील दिले जातील.
कंपनी विंडसर प्रो मध्ये मोठी बॅटरी देणार आहे. माहितीनुसार, यात 50 किलोवॅट प्रति तास किंवा त्याहून अधिक क्षमतेची बॅटरी पॅक देईल. ज्यामुळे एका चार्जमध्ये त्याची रेंज 400 किलोमीटरपेक्षा जास्त असू शकते.
जेएसडब्ल्यू एमजी मोटर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही नवीन इलेक्ट्रिक कार 6 मे 2025 रोजी लाँच केली जाणार आहे.
या कारच्या नेमक्या किंमतीची माहिती फक्त लाँचच्या वेळीच उपलब्ध होणार आहे. परंतु त्याच्या नवीन व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 15 ते 17 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.