Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी अल्ट्राव्हायोलेटला 85 मिलियन डॉलरचा निधी! प्रोडक्शन वाढवून अमेरिकेत उतरण्याची तयारी

85 मिलियन डॉलरचा निधी मिळाल्यानंतर अल्ट्राव्हायोलेटची पुढची चाल काय असेल? नवीन EV प्लॅटफॉर्म, वाढते उत्पादन आणि अमेरिकेतील एंट्रीमुळे भारतीय कंपनीचा जागतिक प्रवास आता वेग घेणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 24, 2026 | 10:31 AM
इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी अल्ट्राव्हायोलेटला 85 मिलियन डॉलरचा निधी! प्रोडक्शन वाढवून अमेरिकेत उतरण्याची तयारी
Follow Us
Follow Us:
  • अल्ट्राव्हायोलेटने उत्पादन वाढवण्यासाठी आणि नवीन EV विकसित करण्यासाठी 85 मिलियन डॉलरचा निधी उभारला.
  • F77 आणि X-47 सोबत टेसेरॅक्ट आणि शॉकवेव्हच्या उत्पादनावर कंपनीचा आता विशेष भर असणार आहे.
  • अमेरिकेसह लॅटिन अमेरिका आणि दक्षिण-पूर्व आशियात विस्तार करण्याची अल्ट्राव्हायोलेटची योजना आहे.
भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रातील अल्ट्राव्हायोलेट कंपनीने मोठी आर्थिक उभारणी केली आहे. कंपनीला नव्या फंडिंग राउंडमधून 85 मिलियन डॉलरचा निधी मिळाला असून यामागे याली कॅपिटलच्या डीप-टेक फंड आणि टीडीके व्हेंचर्सचा प्रमुख सहभाग आहे. वॉल्डन इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि इंटेलचे प्रमुख लिप-बू टॅन यांनीही या गुंतवणुकीत सहभाग घेतला असून ते अल्ट्राव्हायोलेटचे सल्लागार म्हणूनही काम करणार आहेत.

या निधीचा वापर कंपनीच्या सध्याच्या F77 आणि X-47 मॉडेल्सचे उत्पादन वाढवण्यासाठी केला जाणार आहे. याशिवाय आगामी टेसेरॅक्ट इलेक्ट्रिक स्कूटर आणि शॉकवेव्ह एंड्युरो मोटरसायकलसाठीही उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर असेल. कंपनीने मोठ्या प्रोडक्शन क्षमतेच्या नव्या प्लांटची योजना आखली असून भविष्यात देशांतर्गत तसेच परदेशातील मागणी पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक

अल्ट्राव्हायोलेटचा पुढचा फोकस केवळ मोटरसायकल विक्रीपुरता मर्यादित नाही. कंपनी विविध वाहनांसाठी नवीन EV प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. बॅटरी, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, वाहन आर्किटेक्चर आणि सॉफ्टवेअर यांसारख्या महत्त्वाच्या टेक्नोलॉजीवर कंपनीने स्वतःची क्षमता तयार केली आहे. तिच्या बॅटरी तंत्रज्ञानात 48V ते 400V पर्यंतच्या आर्किटेक्चरचा समावेश असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

सध्या अल्ट्राव्हायोलेटची F77 आणि X-47 ही मॉडेल्स भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचली आहेत. X-47 मध्ये रडार आधारित सुरक्षा तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. कंपनीच्या आगामी उत्पादनांमध्ये टेसेरॅक्टला विशेष महत्त्व आहे. अधिकृत माहितीनुसार त्याचे उत्पादन Q1 2027 मध्ये अपेक्षित आहे, तर शॉकवेव्हद्वारे कंपनी इलेक्ट्रिक एंड्युरो सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे.

Triumph Scrambler 400 X पावर, पर्फोर्मंस आणि इंजिनाची A टू Z माहिती! जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय विस्तारही कंपनीच्या योजनेचा महत्त्वाचा भाग आहे. युरोपमध्ये उपस्थिती वाढवल्यानंतर अल्ट्राव्हायोलेटने 2027 मध्ये अमेरिकन मार्केटमध्ये प्रवेश करण्याची योजना आखली आहे. लॅटिन अमेरिका आणि दक्षिण-पूर्व आशियातील संधींचाही कंपनी विचार करत आहे. नव्या गुंतवणुकीमुळे प्रोडक्शन, टेक्नोलॉजी आणि जागतिक विस्तार या तिन्ही आघाड्यांवर कंपनीला वेग देण्याची संधी मिळणार आहे.

 

Web Title: Ultraviolette raises 85 million for global electric expansion auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • motorcycle

संबंधित बातम्या

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स
1

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स

रॉयल एनफिल्डचा‘Journeying Across The Himalayas 2026’ दिल्लीमध्ये रंगणार हिमालयाचा सांस्कृतिक उत्सव!3 डिसेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत
2

रॉयल एनफिल्डचा‘Journeying Across The Himalayas 2026’ दिल्लीमध्ये रंगणार हिमालयाचा सांस्कृतिक उत्सव!3 डिसेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी
3

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या
4

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.