Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक

अल्ट्राव्हायोलेट शॉकवेवचे लाँच पुन्हा लांबणीवर पडले असून आता Q1 2027 मध्ये ही इलेक्ट्रिक बाइक मार्केटमध्ये येणार आहे. 100V टेक्नोलॉजी, 165 किमी रेंज आणि 2.9 सेकंदांत 0-60 kmph वेगामुळे ही बाइक नेमकी किती धुमाकूळ घालणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 29, 2026 | 07:09 PM
Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक
Follow Us
Follow Us:
  • अल्ट्राव्हायोलेट शॉकवेवचे लाँच Q1 2027 पर्यंत पुढे ढकलले असून 165 किमी रेंज मिळणार आहे.
  • नव्या 100V आर्किटेक्चरमुळे शॉकवेवमध्ये जास्त पॉवर आणि फास्ट चार्जिंगचा अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.
  • 14.5 bhp पॉवरसह ही इलेक्ट्रिक बाइक फक्त 2.9 सेकंदांत 0-60 kmph वेग पकडते.
बंगळुरूस्थित इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी अल्ट्राव्हायोलेटने आपल्या शॉकवेव इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या लाँचला पुन्हा एकदा पुढे ढकलले आहे. कंपनीच्या ताज्या माहितीनुसार ही इलेक्ट्रिक बाइक आता 2027 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच Q1 मध्ये मार्केटमध्ये येणार आहे. विशेष म्हणजे, या बाइकसाठी कंपनीने नव्या 100V आर्किटेक्चरचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

अल्ट्राव्हायोलेट शॉकवेवला मार्च 2025 मध्ये पहिल्या 1000 कस्टमरसाठी ₹1.49 लाखांच्या एक्स-शोरूम किंमतीत सादर करण्यात आले होते. त्यावेळी 2026 च्या सुरुवातीपासून डिलिव्हरी सुरू करण्याचे सांगण्यात आले होते. पण आता लाँचला आणखी काही काळ लागणार आहे. कंपनीने शॉकवेवच्या उत्पादनासाठी आपल्या विद्यमान मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये प्रोडक्शन लाइनची तयारी सुरू केली आहे.

ई-स्कूटरच्या निर्यातीत ‘या’ कंपनीचा धुमाकूळ! TVS, Bajaj, Hero अन् Atherलाही टाकलं मागे

नव्या 100V टेक्नोलॉजीमुळे काय बदलणार?

शॉकवेवमध्ये वापरले जाणारे नवीन 100V आर्किटेक्चर या इलेक्ट्रिक बाइकचे खास आकर्षण ठरणार आहे. या टेक्नोलॉजीमुळे पॉवर डिलिव्हरी जास्त प्रभावी होण्यासोबत थर्मल एफिशियन्सी सुधारण्याची अपेक्षा आहे. तसेच चार्जिंगचा वेगही वाढणार आहे. कंपनीने ही बाइक हलक्या वजनाच्या राइडिंग अनुभवासाठी विकसित केली आहे.

शॉकवेवमध्ये 3.5 kWh बॅटरी पॅक देण्यात आला असून IDC सर्टिफाइड रेंज 165 किमी आहे. बाइकचा पीक पॉवर आउटपुट 14.5 bhp आहे, तर मागच्या चाकावर तब्बल 505 Nm टॉर्क मिळतो. 0-60 kmph वेग पकडण्यासाठी तिला फक्त 2.9 सेकंद लागतात. त्यामुळे शहरातील दैनंदिन वापरासोबतच स्पोर्टी राइडिंगचा अनुभव देण्यावर कंपनीचा भर आहे.

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या

19-इंच फ्रंट व्हील आणि USD फोर्क

अल्ट्राव्हायोलेट शॉकवेवमध्ये पुढील बाजूला 19-इंच स्पोक व्हील असून त्यावर 90/90 सेक्शन टायर आहे. मागे 17-इंच स्पोक व्हीलसह 110/90 टायर मिळतो. सस्पेन्शनसाठी पुढे USD फोर्क आणि मागे मोनोशॉक देण्यात आला आहे. ब्रेकिंगसाठी दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक्स मिळतात.

ही इलेक्ट्रिक बाइक Cosmic Black आणि Frost White अशा 2 रंगांमध्ये येणार आहे. सिंगल-सीट आणि ड्युअल-सीट असे दोन्ही ऑप्शन कस्टमरसाठी अव्हेलेबल असतील.

अल्ट्राव्हायोलेटने शॉकवेवला जुन्या 2-स्ट्रोक मोटरसायकलच्या हलक्या, मजेशीर आणि एंगेजिंग राइडिंग अनुभवातून प्रेरणा घेत तयार केले आहे. याआधी कंपनीने Tesseract इलेक्ट्रिक स्कूटरचे लाँच आणि डिलिव्हरी वेळापत्रकही पुढे ढकलले होते. आता शॉकवेवसाठी Q1 2027 ची वेळ निश्चित करण्यात आली असून, लाँचच्या जवळ कंपनी अंतिम स्पेसिफिकेशन्स आणि इतर डिटेल्स जाहीर करणार आहे.

 

Web Title: Ultraviolette shockwave launch q1 2027 100v electric bike auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • motorcycle

संबंधित बातम्या

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास
1

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ
2

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ

Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या काय आहे कारण
3

Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या काय आहे कारण

टीव्हीएससोबत बिझनेस करण्याची संधी! Paddock पार्टनरशिपसाठी कंपनीकडून उद्योजकांना आमंत्रण
4

टीव्हीएससोबत बिझनेस करण्याची संधी! Paddock पार्टनरशिपसाठी कंपनीकडून उद्योजकांना आमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.