(फोटो सौजन्य-AI एआय)
किंमत फरक
किंमतीपासून सुरुवात केली तर होंडा QC3 ची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ₹1,35,000 आहे. टीव्हीएस iQube 3.1 kWh ची किंमत ₹1,36,127 आहे. म्हणजेच होंडा QC3 ही फक्त ₹1,127 ने स्वस्त आहे. त्यामुळे सुरुवातीच्या बजेटच्या दृष्टीने दोन्ही स्कूटरमध्ये फार मोठा फरक नाही.
Honda CB350 ची किंमत ऐकून व्हाल खुश! बुकिंग करा फक्त Rs. 5,000 मध्ये
बॅटरी आणि टेक्निकल फीचर्स
होंडा QC3 मध्ये 3.0kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीने याची IDC रेंज 145km असल्याचा दावा केला आहे. स्कूटरला 5-इंच TFT डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल आणि SMS अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन तसेच स्मार्ट की मिळते. लांब सीट आणि मोठा फ्लोअरबोर्ड यामुळे दैनंदिन वापरासाठीही योग्य ठरू शकते.
दुसरीकडे, टीव्हीएस iQube 3.1 kWh मध्ये 4.4kW हब मोटरसह 3.1kWh बॅटरी मिळते. याची IDC रेंज 123km असून टॉप स्पीड 82kph आहे. स्टँडर्ड चार्जरच्या मदतीने 0-80% चार्जिंगसाठी 4 तास 30 मिनिटे लागतात. यात Eco आणि Power असे 2 राइडिंग मोड आहेत. 5-इंच TFT डिस्प्लेसोबत कनेक्टिव्हिटी फीचर्सही मिळतात.
Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख
ब्रेकिंगसाठी दोन्ही स्कूटरमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. टीव्हीएस iQube मध्ये 220mm फ्रंट डिस्क आणि 130mm रिअर ड्रम ब्रेक आहे, तर होंडा QC3 मध्ये फ्रंट डिस्क आणि रिअर ड्रम सेटअप मिळतो. त्यामुळे ग्राहकांसाठी निवड करताना किंमतीसोबत रेंज, चार्जिंग वेळ आणि दैनंदिन वापराच्या गरजा लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.






