फोटो सौजन्य: @vfofficialvn (X.com)
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यातही इलेक्ट्रिक कारच्या मागणीत मोठे वाढ होतेय. हीच मागणी इतर देशातील ऑटो कंपन्यांना सुद्धा इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करण्यास प्रोत्साहित करत आहे. म्हणूनच तर आता व्हिएतनामची ऑटो कंपनी Vinfast भारतात आपल्या कार लाँच करण्यास सज्ज होत आहे.
व्हिएतनामची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी विनफास्ट लवकरच त्यांच्या दोन एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे. याशिवाय, कंपनी भारतात इतर कोणते वाहन लाँच करू शकते. त्यात कोणते फीचर्स आणि रेंज दिले जाऊ शकते? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनफास्ट भारतात त्यांची तिसरी कार लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने भारतात या वाहनासाठी पेटंट दाखल केले आहे.
माहितीनुसार, Vinfast Limo Green एमपीव्ही भारतात लाँच केली जाऊ शकते. या इलेक्ट्रिक एमपीव्हीला कमर्शियल वाहन म्हणूनच लाँच केले जाऊ शकते.
कंपनी लिमो ग्रीन इलेक्ट्रिक एमपीव्ही सात-सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही म्हणून लाँच केली जाईल. यात एलईडी डीआरएल, एलईडी लाईट्स, 18 इंच अलॉय व्हील्स, 170 मिमी ग्राउंड क्लीयरन्स, 10.1 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, चार स्पीकर्स, सिंगल झोन एसी, एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी सारख्या काही फीचर्सचा समावेश असेल. त्याचे इंटीरियर देखील काळ्या थीमवर असू शकते.
15 ऑगस्ट महिंद्राने गाजवला, एक-दोन नव्हे तर 4 SUV कॉन्सेप्ट केल्यात सादर
विनफास्टची ही सात सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही 60.13 kWh एलएफपी बॅटरीने सुसज्ज असेल. जी एका चार्जवर 450 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. डीसी फास्ट चार्जर वापरून ती फक्त 30 मिनिटांत 10 ते 70 टक्के चार्ज होईल. या कारमध्ये इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट्स मोड असे तीन ड्रायव्हिंग मोड दिले जातील.
विनफास्टची लिमो ग्रीन इलेक्ट्रिक एमपीव्ही भारतातील कमर्शियल वाहन सेगमेंटमध्ये सादर केली जाऊ शकते. या सेगमेंटमध्ये, ही कार थेट BYD eMax सोबत स्पर्धा करेल.
अद्याप विनफास्टने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की ही सात-सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही 2026 पर्यंत भारतात लाँच केली जाऊ शकते.