फोटो सौजन्य: iStock
भारतात प्रत्येक ऑटो कंपनी नवनवीन कार्स लाँच करत ग्राहकांना आकर्षित करू पाहत आहे. तसेच, विविध डिस्काउंट ऑफर्स सुद्धा लाँच करत आहे. जेणेकरून त्याच्या कार्सची विक्री वाढावी. अशातच, जर तुम्ही सुद्धा स्वतःची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल मात्र योग्य डिस्काउंटच्या प्रतीक्षेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे Volkswagen फक्त एक नाही तर दोन कार्सवर दमदार डिस्काउंट देत आहे. तेही खास गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, फोक्सवॅगन इंडियाने कार खरेदीदारांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही tiguan वर 2.10 लाख रुपयांपर्यंत आणि सेडान virtus वर 1.75 लाख रुपयांपर्यंतच्या सूट जाहीर केल्या आहेत. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की या सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना सर्वोत्तम डील देण्यासाठी ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. सवलतीबद्दल अधिक माहितीसाठी, ग्राहक त्यांच्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधू शकतात. चला या दोन्ही कार्सबद्दलअधिक माहिती जाणून घेऊयात.
फोक्सवॅगन टिगुनमध्ये पॉवरट्रेन म्हणून 1.0-लिटर टीएसआय आणि 1.5-लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन पर्याय आहेत. 1.0-लिटर इंजिन 115 बीएचपी पॉवर आणि 178 एनएम टॉर्क निर्माण करते.
तर 1.5-लिटर इंजिन 150 बीएचपी पॉवर आणि 250 एनएम टॉर्क निर्माण करते. केबिनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात डिजिटल कॉकपिट, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि 6 एअरबॅग्ज अशी सेफ्टी फीचर्स आहेत.
15 ऑगस्ट महिंद्राने गाजवला, एक-दोन नव्हे तर 4 SUV कॉन्सेप्ट केल्यात सादर
फोक्सवॅगन व्हर्टसमध्ये 1.0-लिटर आणि 1.5-लिटर टीएसआय पेट्रोल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत. स्मूथ ड्राइव्ह आणि हायवेवरील उत्कृष्ट स्थिरतेमुळे ही सेडान परफॉर्मन्सच्या दृष्टीने खास ओळखली जाते. यात 10-इंच टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, रेन-सेन्सिंग वायपर्स, क्रूझ कंट्रोल आणि 6 एअरबॅग्ज यांसारखी फीचर्स आहेत. तसेच, 1.5 टीएसआय इंजिनमध्ये ॲक्टिव्ह सिलेंडर तंत्रज्ञान असून, गरज पडल्यास 4 पैकी 2 सिलेंडर बंद करून इंधन कार्यक्षमता वाढवते.
महत्वाची सूचना: ही सवलत तुमच्या शहरात किंवा डीलरनुसार बदलू शकते. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी सवलतीचे सर्व डिटेल्स तपासून घ्या.