Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात Vinfast च्या ‘या’ 7 सीटर इलेक्ट्रिक कारची पहिली झलक समोर! जाणून घ्या फीचर्स आणि पॉवर

भारतीय ऑटो मार्केटमध्ये व्हिएतनामची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी Vinfast त्यांची नवीन MPV आणायच्या तयारीत दिसत आहे. ज्यामुळे नक्कीच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपल्याला अजून स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 02, 2026 | 05:58 PM
फोटो सौजन्य: @AarizRizvi/ X.com

फोटो सौजन्य: @AarizRizvi/ X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • विनफास्ट त्यांची पहिलीवहिली MPV भारतात लाँच करणार
  • Vinfast VF MP7 असे या कारचे नाव
  • लवकरच लाँच होण्याची शक्यता
भारतीय ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कारच्या मागणीत चांगली वाढ होतेय. इलेक्ट्रिक कारकडे भविष्यातील एक उत्तम पर्याय म्हणून पाहिले जाते आहे. त्यात आता सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत इंधनाची टंचाई लक्षात घेत अनेक जण EV वाहन खरेदीला प्राधान्य देत आहेत.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी मागणी पाहता अनेक विदेशी ऑटो कंपन्या देखील इलेक्ट्रिक कार ऑफर करताना दिसत आहे. अशीच एक कंपनी म्हणेज व्हिएतनामची VinFast कंपनी.

व्हिएतनामची कार निर्माता कंपनी VinFast ने भारतात आपल्या नव्या VinFast VF MP7 या इलेक्ट्रिक MPVची पहिली झलक सादर केली आहे. यामुळे ही कार लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही 7-सीटर इलेक्ट्रिक गाडी असून कुटुंबासाठी खास डिझाइन करण्यात आली आहे.

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

VF MP7 चे फीचर्स

VF MP7 खासगी वापर लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. यात लेदरसारख्या आरामदायी सीट्स, आकर्षक इंटीरियर लाइटिंग, की-लेस एंट्री आणि 19 इंचाचे अलॉय व्हील्स दिले आहेत. यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि प्रीमियम वाटतो.

VF MP7 चे एक्स्टेरियर आणि इंटीरियर

रिपोर्टनुसार, या MPVचा डिझाइन VinFastच्या खास स्टाइलमध्ये करण्यात आला आहे. यात LED हेडलाइट्स आणि रियर कनेक्टेड लाइट्स दिल्या आहेत, ज्यामुळे गाडीला आधुनिक लूक मिळतो. इंटीरियरमध्ये 10.1 इंचाची टचस्क्रीन, चार्जिंगसाठी USB पोर्ट्स, उंची समायोजित करता येणारी ड्रायव्हर सीट आणि सहज वापरता येणारे स्टीयरिंग व्हील दिले आहे.

VF MP7 ची बॅटरी आणि परफॉर्मन्स

या कारबाबत सर्व तपशील अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाहीत. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार यामध्ये सुमारे 60.1kWh क्षमतेची बॅटरी आणि फ्रंट-अ‍ॅक्सलवर आधारित इलेक्ट्रिक मोटर दिली जाऊ शकते. ही मोटर अंदाजे 150bhp पॉवर आणि 280Nm टॉर्क निर्माण करू शकते, ज्यामुळे शहरातील आणि लांब पल्ल्याच्या ड्रायव्हिंगसाठी चांगली परफॉर्मन्स मिळण्याची अपेक्षा आहे.

आम्हीच इथले बादशाह!’या’ ऑटो कंपनीने Electric SUVs बाजार एकतर्फी गाजवलंय, एका वर्षात 50,000 वाहने सोल्ड आऊट

भारतातील वाढती लोकप्रियता

भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार झपाट्याने वाढत आहे आणि VinFast देखील आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. MPV सेगमेंट भारतात विशेषतः लोकप्रिय आहे, कारण या गाड्या जास्त जागा आणि बहुउद्देशीय वापरासाठी योग्य असतात.

ही कार पुढील काही आठवड्यांत लॉन्च होण्याची शक्यता असून, तिचे वेगवेगळे व्हेरिएंट, किंमत आणि रंगांची माहिती लवकरच जाहीर केली जाईल.

Web Title: Vinfast vf mp7 new mpv electric 7 seater car soon launch in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • automobile
  • electric car

संबंधित बातम्या

आम्हीच इथले बादशाह!’या’ ऑटो कंपनीने Electric SUVs बाजार एकतर्फी गाजवलंय, एका वर्षात 50,000 वाहने सोल्ड आऊट
1

आम्हीच इथले बादशाह!’या’ ऑटो कंपनीने Electric SUVs बाजार एकतर्फी गाजवलंय, एका वर्षात 50,000 वाहने सोल्ड आऊट

Tesla ला डच्चू देत ‘ही’ चिनी ऑटो कंपनी गेली पुढे! तरीसुद्धा प्रॉफिट पडलाच कसा?
2

Tesla ला डच्चू देत ‘ही’ चिनी ऑटो कंपनी गेली पुढे! तरीसुद्धा प्रॉफिट पडलाच कसा?

कोणत्या कंपनीची कार सर्व्हिस एकदम झक्कास? जाणून घ्या लोकप्रिय Cars ची सर्व्हिस कॉस्ट
3

कोणत्या कंपनीची कार सर्व्हिस एकदम झक्कास? जाणून घ्या लोकप्रिय Cars ची सर्व्हिस कॉस्ट

Nissan ची मोठी झेप! ‘या’ कारच्या एंट्रीमुळे विक्रीत 98 टक्क्यांची ऐतिहासिक वाढ, मार्चमध्ये 5 वर्षांतील सर्वोच्च विक्रीची नोंद
4

Nissan ची मोठी झेप! ‘या’ कारच्या एंट्रीमुळे विक्रीत 98 टक्क्यांची ऐतिहासिक वाढ, मार्चमध्ये 5 वर्षांतील सर्वोच्च विक्रीची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.