फोटो सौजन्य: iStock
फक्त भारतातच नव्हे तर जागतिक मार्केटमध्ये देखील इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतींना कंटाळून अनेक जण आता इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहे. हि वाढती मागणी पाहूनच अनेक ऑटो कंपन्या ज्या पूर्वी फक्त इंधनावर चालणाऱ्या कार उत्पादित करत होत्या, त्याच आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करत आहे.
ग्लोबल मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत, त्यातीलच एक कंपनी म्हणजे फोक्सवॅगन. आता फोक्सवॅगन ईव्ही सेगमेंटमध्ये दमदार एंट्री मारण्यास सज्ज झाली आहे. फोक्सवॅगनने जागतिक स्तरावर आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. कंपनीने ऑल-इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट ID.EVERY1 सादर केली आहे. ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार असण्यासोबतच, एक एंट्री लेव्हल आणि सर्वात परवडणारी ईव्ही देखील असणार आहे. ही कार सध्या युरोपियन बाजारपेठेसाठी आणण्यात आली आहे. ही कार 2027 पर्यंत लाँच केली जाऊ शकते. फोक्सवॅगन ID.EVERY1 कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार कोणत्या खास फीचर्ससह येऊ शकते त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
Maruti Wagon R वरील डिस्काउंटमध्ये ‘एवढी’ वाढ कधीच झाली नाही ! आजच करून टाका बुक
या कारचे डिझाइन अतिशय मिनिमलिस्ट आणि कर्व्ह आहे, जे त्याच्या शार्प बॉडी लाइन्स पेक्षा खूपच गोलाकार आहे. त्याची लांबी 3880 मिमी आणि बूट स्पेस 305 लिटर आहे. यात काळ्या रंगाच्या पॅनेलवर आयताकृती एलईडी लाइटिंग आहे. बंपरवरील कॉन्ट्रास्टिंग ब्लॅक ट्रिम कारला चांगला लूक देते.
या कारचे सिल्हूट अगदी स्वच्छ केले आहे. याची मजबूती वाढवण्यासाठी बॉडी क्लॅडिंग किंवा कॉन्ट्रास्टिंग घटक नाहीत. यात फ्लश-टाइप डोअर हँडल, ब्लॅक-आउट ORVM आणि १९-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आहेत.
मागील लूकबद्दल बोलायचे झाले तर, यात काळ्या पॅनलवर रॅप अराउंड टेल लाइट्स आहेत, ज्यामध्ये लाल लायटनिंग एलिमेंट एकत्रित केला आहे. यात इंटिग्रेटेड स्टॉप लाईटसह रूफवरील माउंटेड स्पॉयलर लिप आहे.
फोक्सवॅगन ID.EVERY1 कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कारचे इंटिरिअर फ्यूचरिस्टिक दिसते. त्याच्या डॅशबोर्डवर एक मोठी स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यामध्ये काही फिजिकल कंट्रोल असलेले पॅनेल देखील खाली दिले आहे. दोन-स्पोक स्टीअरिंग व्हील देण्यात आले आहे, ज्यामध्ये माउंटेड कंट्रोल्स आहेत. यात ब्लूटूथ स्पीकर आणि फ्रंट सेंटर आर्मरेस्ट देखील आहे.
फोक्सवॅगन ID.EVERY1 कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार पूर्णपणे नवीन मॉड्यूलर MEB प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. त्यात फ्रंट-व्हील ड्राइव्ह ट्रेन मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनीने अद्याप बॅटरी पॅक आणि त्याचा आकार उघड केलेला नाही, परंतु अपेक्षा आहे की इलेक्ट्रिक मोटर 95 पीएस पॉवर जनरेट करेल आणि कमाल 130 किमी प्रतितास वेग गाठेल.
या नवीन कारच्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोललो तर, त्यात उपलब्ध असलेल्या बॅटरी बॅकमध्ये एका चार्जमध्ये किमान 250 किलोमीटरची रेंज देण्याची क्षमता असेल.