फोटो सौजन्य: Social Media
देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या जातात, ज्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार डिझाइन करण्यात येतात. त्यामुळेच भारतीय मार्केटमध्ये कारची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. ग्राहक देखील आपल्या बजेटनुसार मार्केटमध्ये असणाऱ्या विविध ब्रँडच्या कारला प्राधान्य देत असतात. नुकताच एक रिपोर्ट प्रदर्शित झाला आहे, ज्यात फेब्रुवारी 2025 मध्ये एकूण किती कारची विक्री झाली आहे, याबद्दल माहिती मिळाली आहे.
Tata Curvv चा Dark Edition मार्केटमध्ये धडाडणार, कधी होईल लाँच? जाणून घ्या
फेब्रुवारी 2025 मध्ये देशातील सर्वाधिक विक्री झालेल्या कारची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, गेल्या महिन्यात Maruti Fronx ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. या कारच्या 21,461 युनिट्सची विक्री झाली आहे. 20 हजारांहून अधिक युनिट्स विकणारी ही एकमेव कार ठरली आहे. तर, मारुती वॅगनआरने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. वॅगनआरच्या 19,879 युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच हॅचबॅक सेगमेंटमध्ये ही कार नंबर 1 कार होती. या यादीत मारुतीच्या इतर हॅचबॅकचाही समावेश होता.
मारुतीच्या तीन हॅचबॅक कारची दमदार विक्री 2025 मध्ये झाली आहे. यात मारुती वॅगन आरच्या 19,879 युनिट्सची विक्री झाली आहे. तर मारुती स्विफ्टच्या 16,269 युनिट्सची विक्री झाली आहे व मारुती बलेनोच्या 15,480 युनिट्सची विक्री झाली आहे.
फेब्रुवारीच्या विक्रीत मारुती वॅगनआरने स्वतःच्या कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या हॅचबॅक स्विफ्ट आणि बलेनोला मागे टाकले. त्याच वेळी, विक्रीच्या बाबतीत, त्याने हुंडई क्रेटा, मारुती ब्रेझा, टाटा नेक्सन, टाटा पंच, मारुती डिझायर आणि मारुती एर्टिगा यांसारख्या मॉडेल्सनाही मागे टाकले. विशेष म्हणजे या यादीत टॉप-5 मध्ये असणारी टाटा पंच आता 10 व्या स्थानावर पोहोचली आहे. वॅगनआरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 564,500 लाख रुपये आहे.
March 2025 मध्ये कार खरेदी करण्याची सुवर्ण संधी, Tata Cars वर मिळतोय भरघोस डिस्काउंट !
मारुती सुझुकी वॅगनआरमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, त्यात नेव्हिगेशनसह 7 इंचाचा स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस, क्लाउड बेस्ड सर्व्हिस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, चार स्पीकर्स, एएमटीमध्ये हिल-होल्ड असिस्ट, माउंटेड कंट्रोल्ससह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीअरिंग व्हील आहे.
हे 1.0 -लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल आणि 1.2-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह ड्युअलजेट ड्युअल व्हीव्हीटी तंत्रज्ञानाद्वारे पॉवर मिळवते. 1.0-लिटर इंजिनचा दावा 25.19 किमी/लीटर मायलेज आहे, तर त्याचा सीएनजी व्हेरियंट 34.05 किमी/किलोग्राम मायलेज देतो. 1.2-लिटर के सिरीज ड्युअलजेट ड्युअल व्हीव्हीटी इंजिनची फ्युएल एफिशियंसी 24.43 किमी प्रति लिटर (ZXI AGS /ZXI+ AGS ट्रिम्स) असल्याचा दावा केला आहे.