फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या विविध प्रकारच्या उत्कृष्ट कार ऑफर करत असतात, परंतु त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे मारुती सुझुकी. या कंपनीने भारतीय ग्राहकांच्या विविध आवश्यकतांना समर्पित असलेल्या कार्स सादर केल्या आहेत. मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेतील विविध बजेट्स आणि ग्राहकांच्या आवश्यकतांनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनसह कार्स उपलब्ध केल्या आहेत.
कंपनीने किफायती किमतीत उत्तम फीचर्स आणि विश्वसनीयता देऊन ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. विशेषतः, मारुतीच्या कार्समध्ये इकोनॉमिकल इंधन वापर, आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव आणि कमी देखभाल खर्च यामुळे ग्राहकांची पहिली पसंती होय. तसेच, या कार्सचा इंटीरियर स्पेस, सेफ्टी फीचर्स आणि परफॉर्मन्ससुद्धा प्रेक्षकांना आकर्षित करत असतात. त्यामुळे, मारुती सुझुकी भारतीय बाजारात एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय ब्रँड म्हणून ओळखली जाते.
मारुती सुझुकीच्या अनेक कार आहेत, ज्या आजही मार्केटमध्ये आपले स्थान टिकवून आहे. यातीलच एक कार म्हणजे Maruti Wagon R. आजही ग्राहक नवीन लाँच झालेल्या कारपेक्षा वॅगन आर कारला जास्त प्राधान्य देत असतात.
वॅगनआर ही मारुती सुझुकी इंडियाच्या पोर्टफोलिओमधील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. एवढेच नाही तर ती देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार देखील आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये 19,879 युनिट्स विकल्या गेल्या. वॅगनआरच्या नवीन मॉडेलच्या लाँचिंगपासून, त्याची विक्री झपाट्याने वाढली आहे. आता कंपनी या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये या हॅचबॅकची विक्री वाढवण्यासाठी 80,000 रुपयांपर्यंतची सूट देत आहे.
विशेष म्हणजे फेब्रुवारीमध्ये मारुती कंपनी वॅगन आरवर 70000 रुपयांची सूट देत होती. याचा अर्थ आता ग्राहकांना 10000 रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळणार आहे. कंपनी तिच्या एएमटी व्हेरियंटवर 80000 रुपये आणि सीएनजी व्हेरियंटवर 75000 रुपयांचे ऑफर्स देत आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ही 564,500 रुपये आहे.
February 2025 मध्ये ग्राहकांना भुरळ याच ‘कार्स’ची, ‘ही’ कार ठरली ग्राहकांची पहिली पसंत
मारुती सुझुकी वॅगनआरमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, त्यात नेव्हिगेशनसह 7 इंचाचा स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, क्लाउड बेस्ड सर्व्हिस, ईबीडीसह एबीएस, एएमटीमध्ये हिल-होल्ड असिस्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, चार स्पीकर्स, स्टीअरिंग व्हील, आणि माउंटेड कंट्रोल्ससह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.
हे 1.0-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल आणि 1.2-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह ड्युअलजेट ड्युअल व्हीव्हीटी तंत्रज्ञानाद्वारे जबरदस्त पॉवर मिळवते. 1.0-लिटर इंजिन 25.19 किमी/लीटर मायलेज देते, तर त्याचा सीएनजी व्हेरियंट 34.05 किमी/किलोग्राम मायलेज देते. 1.2-लिटर के-सिरीज ड्युअलजेट ड्युअल व्हीव्हीटी इंजिनची इंधन कार्यक्षमता 24.43 किमी प्रति लिटर असल्याचा दावा केला आहे.