Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Volkswagen Polo आता इलेक्ट्रिक अवतारात धावणार! जाणून घ्या रेंज आणि फीचर्स

Volkswagen ने त्यांची हॅचबॅक Polo चे इलेक्ट्रिक व्हर्जन ID Polo सादर केले आहे. चला या कारच्या फीचर्स आणि रेंजबद्दल माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 29, 2026 | 08:45 PM
फोटो सौजन्य: @DriveGreen80167/ X.com

फोटो सौजन्य: @DriveGreen80167/ X.com

Follow Us
Follow Us:

जर्मन वाहन निर्माता Volkswagen ने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक Volkswagen Polo चे पहिले पूर्णपणे इलेक्ट्रिक मॉडेल Volkswagen ID Polo सादर केले आहे. ही नवी इलेक्ट्रिक कार कंपनीच्या MEB+ प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या इलेक्ट्रिक हॅचबॅकची बुकिंग एप्रिल 2026 च्या अखेरीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. याची किंमत सुमारे 25,000 युरो म्हणजेच अंदाजे 27.76 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते.

साइज आणि डिझाइन

ID Polo ची लांबी 4,053mm, रुंदी 1,816mm आणि उंची 1,530mm असून याचा व्हीलबेस 2,600mm आहे. ही कार Volkswagen च्या नवीन “Pure Positive” डिझाइन भाषेवर आधारित पहिली कार आहे. पुढील बाजूस एकमेकांना जोडलेल्या LED हेडलाइट्स देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये Eyelid-स्टाइल DRLs आणि मध्ये प्रकाशित Volkswagen लोगो दिला आहे.

फ्रंट बंपर साधा आणि आकर्षक ठेवण्यात आला आहे. यात एअर डॅमसह दोन्ही बाजूंना उभे एअर इंटेक्स आणि छोटा फ्रंट स्प्लिटर देण्यात आला आहे.

साइड आणि रियर डिझाइन

साइड प्रोफाइलमध्ये उठावदार लाइन आणि रुंद फेंडर्स देण्यात आले आहेत, जे कारला स्पोर्टी लुक देतात. कंपनीनुसार, याचा C-पिलर डिझाइन Volkswagen Golf पासून प्रेरित आहे. यामध्ये 19-इंचपर्यंतचे अलॉय व्हील्सचा पर्याय उपलब्ध आहे.

मागील बाजूस पूर्ण रुंदीभर पसरलेली LED लाइट बार देण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रकाशित Volkswagen लोगो आहे. याशिवाय वर मोठा रूफ स्पॉइलर, लहान वर्टिकल एअर आउटलेट्स आणि बंपरवर डिफ्यूझरसारखा डिझाइन देण्यात आला आहे.

इंटीरियर आणि फीचर्स

या कारच्या डॅशबोर्डच्या मध्यभागी 13-इंचाची मोठी टचस्क्रीन देण्यात आली आहे, जी वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते. स्क्रीनखाली AC व्हेंट्स आणि हॅझर्ड लाईट्स, क्लायमेट कंट्रोल व डिफॉगरसारखे आवश्यक बटण्स देण्यात आले आहेत.

फ्लोटिंग सेंटर कन्सोलमध्ये वायरलेस चार्जिंग पॅड, म्युझिक कंट्रोलसाठी गोल नॉब, कप होल्डर्स, चार्जिंग पोर्ट्स आणि स्टोरेजसाठी भरपूर जागा देण्यात आली आहे.

Keeway India ची नवीन क्रुझर बाईक झाली लाँच! एक्स शोरूम किंमत 4.22 लाख रुपये, फीचर्स..

स्टीयरिंग आणि इतर सुविधा

या कारमध्ये दोन-स्पोक हीटेड स्टीयरिंग व्हील दिले असून त्यावर अनेक कंट्रोल बटण्स आहेत. ड्रायव्हरसमोर 10-इंचाचा डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे, जो क्लासिक लेआउटमध्ये सेट करता येतो. यामध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ॲम्बिएंट लाइटिंग आणि लेदरेट सीट्स मिळतात.

याशिवाय रियरव्ह्यू कॅमेरा, ऑटो-डिमिंग IRVM आणि V2L (Vehicle-to-Load) सारख्या आधुनिक सुविधा देखील उपलब्ध आहेत.

बॅटरी आणि परफॉर्मन्स

ID Polo मध्ये 37kWh आणि 52kWh असे दोन बॅटरी पर्याय दिले आहेत. दोन्ही व्हेरिएंटमध्ये फ्रंट-व्हील ड्राइव्ह (FWD) सेटअप असून इलेक्ट्रिक मोटर 290Nm टॉर्क जनरेट करते.

37kWh बॅटरीसह लोअर व्हेरिएंटमध्ये 116hp आणि हायर व्हेरिएंटमध्ये 135hp पॉवर मिळते. कंपनीनुसार, ही बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 329 किमीपर्यंत रेंज देते.

या कारमध्ये 90kW DC फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे, ज्यामुळे बॅटरी 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 23 मिनिटे लागतात.

52kWh पावरफुल व्हेरिएंट

52kWh बॅटरी असलेला व्हेरिएंट 211hp पॉवर जनरेट करतो. तसेच, Volkswagen या कारचे स्पोर्टी Volkswagen GTI व्हर्जनही विकसित करत आहे, ज्यामध्ये 226hp पॉवर मिळण्याची शक्यता आहे.

52kWh बॅटरीसह ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 454 किमीपर्यंत रेंज देऊ शकते. 105kW DC फास्ट चार्जरने बॅटरी 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी अंदाजे 24 मिनिटे लागतात.

Web Title: Volkswagen famous hatchback car polo electric version polo id unveils

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car

संबंधित बातम्या

कियाचा मोठा धमाका! कियाच्या ३ नवीन एसयूव्ही लवकरच येणार मार्केटमध्ये!
1

कियाचा मोठा धमाका! कियाच्या ३ नवीन एसयूव्ही लवकरच येणार मार्केटमध्ये!

२०२७ पूर्वी भारतात होणार ‘या’ नवीन इलेक्ट्रीक कार लॉन्च! संपूर्ण यादी जाणून घ्या
2

२०२७ पूर्वी भारतात होणार ‘या’ नवीन इलेक्ट्रीक कार लॉन्च! संपूर्ण यादी जाणून घ्या

निसान टेक्टॉनचा पहिला लूक समोर; ‘बेबी पेट्रोल’ म्हणून मारणार एन्ट्री
3

निसान टेक्टॉनचा पहिला लूक समोर; ‘बेबी पेट्रोल’ म्हणून मारणार एन्ट्री

ह्युंडाईच्या ३० व्या वर्षानिमित्त २४ जूनपासून ‘स्मार्ट केअर क्लिनिक’ सुरू; मोफत ३० पॉइंट चेक-अपसह कार मेंटेनन्स आणि पार्ट्सवर सूट!
4

ह्युंडाईच्या ३० व्या वर्षानिमित्त २४ जूनपासून ‘स्मार्ट केअर क्लिनिक’ सुरू; मोफत ३० पॉइंट चेक-अपसह कार मेंटेनन्स आणि पार्ट्सवर सूट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.