फोटो सौजन्य: Pinterest
2026 मॉडेलमधील सर्वात मोठा बदल म्हणजे नव्या पिवळ्या (Yellow) रंगाचा समावेश. हा रंग आधीपासून उपलब्ध असलेल्या लाल (Red) आणि काळ्या (Black) रंगांसोबत उपलब्ध असेल, ज्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील. रंगात बदल झाला असला तरी V302C चे एकूण डिझाइन पूर्वीसारखेच ठेवण्यात आले आहे. यामध्ये त्याचा निओ-रेट्रो क्रूझर लूक कायम राखण्यात आला आहे, जो भारतात लाँचपासूनच त्याची खास ओळख बनला आहे.
Updated Hyundai Ioniq 5 भारतीय बाजारात लॉन्च! देण्यात आला प्रीमियम लुक
मेकॅनिकलदृष्ट्या ही बाईक जुन्या मॉडेलसारखीच आहे. यात 298cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड V-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनची खासियत म्हणजे यामध्ये बेल्ट-ड्राइव्ह सिस्टम दिली आहे, जी या सेगमेंटमध्ये वेगळी ठरते. हे इंजिन 8,500rpm वर 29.5hp पॉवर आणि 6,500rpm वर 26.5Nm टॉर्क जनरेट करते.
या बाईकमध्ये पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल शॉक ॲब्जॉर्बर्स देण्यात आले आहेत. ब्रेकिंगसाठी पुढील चाकात 300mm डिस्क ब्रेक आणि मागील चाकात 240mm डिस्क ब्रेक दिले आहेत. यासोबतच सुरक्षिततेसाठी ड्युअल-चॅनल ABS ची सुविधा देण्यात आली आहे.
2026 Keeway V302C ची किंमत सध्या 4.22 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याआधी या बाईकची किंमत 4.29 लाख रुपये होती. नंतर कर सवलतीचा लाभ देण्यासाठी ती तात्पुरती 3.99 लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आली होती. आता नव्या मॉडेलसह किंमत पुन्हा वाढवण्यात आली आहे.






