फोटो सौजन्य: @volkswagenindia (X.com)
भारतीय ऑटो बाजारात विविध सेगमेंट कार ऑफर केल्या जातात. यात सर्वात जास्त डिमांड ही बजेट फ्रेंडली कार्सला असते. मात्र, याव्यतिरिक्त प्रीमियम सेगमेंटमधील कार्सला देखील ग्राहकांची चांगली पसंती मिळते. यामुळेच अनेक ऑटो कंपन्या प्रीमियम कार देखील ऑफर करत असतात. नुकतेच Volkswagen ने सुद्धा एक दमदार आणि प्रीमियम कार लाँच केली आहे. कंपनीने या कारची बुकिंग आधीच सुरू केली आहे आणि बुकिंग सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच पहिला लॉट बुक करण्यात आला. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
फोक्सवॅगनने भारतीय मार्केटमध्ये अनधिकृतपणे Volkswagen Golf GTI लाँच केली आहे. कंपनीने ही कार किती किमतीत लाँच केली आहे? कोणत्या प्रकारच्या फीचर्स आणि इंजिनसह ती ऑफर केली जात आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
फुल्ल टॅंकमध्ये 700 KM ची रेंज ! 67 हजार रुपये किंमत असणारी बाईक खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड
Volkswagen Golf GTI मध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यात 12.9 -इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, सात स्पीकर्ससह ऑडिओ सिस्टम,10.25 -इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर, अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, अँबियंट लाइट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, रियर एसी व्हेंट्स, की-लेस एंट्री, पुश बटण स्टार्ट, जीटीआय बॅजिंग, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, 18-इंच अलॉय व्हील्स आणि 45 लिटर क्षमतेचे पेट्रोल टँक आहे.
या कारमध्ये 7 एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, हिल होल्ड असिस्ट, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक फ्रंट डिफरेंशियल लॉक, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट, फ्रंट असिस्ट, रियर व्ह्यू कॅमेरा असे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
फोक्सवॅगन चार रंगांच्या पर्यायांमध्ये गोल्फ जीटीआय देते. यामध्ये ings Red Metallic, Oryx White Pearl, Moonstone Grey आणि Grenadilla Black Metallic यांचा समावेश आहे.
फोक्सवॅगन गोल्फ जीटीआयमध्ये दोन लिटर क्षमतेचे टीएसआय इंजिन मिळाले आहे. या इंजिनसह, कारला 0-100 किलोमीटरची स्पीड गाठण्यासाठी फक्त 5.9 सेकंद लागतात. दोन लिटरचे इंजिन 265 हॉर्सपॉवर आणि 370 न्यूटन-मीटर टॉर्क निर्माण करते. यासोबतच, यात 7-स्पीड डीएसजी ट्रान्समिशन मिळते.
‘या’ 4 घोडचुका टाळाच ! अन्यथा तुमच्या नजरेसमोरच तुमची कार होईल भस्मसात
फोक्सवॅगन गोल्फ जीटीआयची एक्स-शोरूम किंमत 53 लाख रुपयांपासून सुरू होईल. ही किंमत एक इंट्रोडक्टरी किंमत आहे आणि नंतर बदलू देखील शकते.
ही कार फोक्सवॅगनने प्रीमियम कार म्हणून लाँच केली आहे. अशा परिस्थितीत, ही कार मिनी कूपर सारख्या कारशी थेट स्पर्धा करेल.