फोेटो सौजन्य: Social Media
सणासुदीचा काळ आता चालू झाला आहे. या शुभ काळात अनेक जण नवीन कार घेताना दिसतात. जर तुम्ही सुद्धा नवीन कार घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण फोक्सवॅगनने या कंपनीने दोन नवीन कार मार्केटमध्ये लाँच केल्या आहेत.
अत्यंत सुरक्षित कार बनवणाऱ्या फोक्सवॅगन या कंपनीने भारतीय बाजारपेठेत मध्यम आकाराच्या सेडान कार सेगमेंटमध्ये Virtus विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. सणासुदीचा काळ सुरू होताच कंपनीने आपल्या सेडान कारच्या दोन नवीन व्हर्जन बाजारात आणले आहेत. फोक्सवॅगनने भारतीय बाजारपेठेत मध्यम आकाराची सेडान कार व्हरटसची जीटी लाइन आणि जीटी प्लस स्पोर्ट लाँच केली आहे. या कार्सना स्पोर्टी आणि ब्लॅक थीमसह लाँच करण्यात आले आहेत.
कंपनीने Virtus च्या GT-Line एडिशनमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. यात एलईडी डीआरएलसह ब्लॅक एलईडी हेडलॅम्प, ब्लॅक फ्रंट ग्रील,16-इंच ब्लॅक अलॉय व्हील, इलेक्ट्रिक सनरूफ, स्टार्ट/स्टॉप बटणासह कीलेस एंट्री, दरवाजे आणि बूटवर जीटी-लाइन बॅजिंग, ब्लॅक ORVM, गडद क्रोम डोअर हँडल, ब्लॅक कलर अशी वैशिष्ट्ये आहेत.
Virtus चे GT Plus Sport व्हेरियंटमध्ये लाल GT लोगो, ब्लॅक केलेले हेडलॅम्प, GT बॅज, एरो किट, ब्लॅक केलेले फ्रंट ग्रिल, ORVM, विंडो बार, गडद क्रोम डोअर हँडल, ग्लॉसी ब्लॅक स्पॉयलर, रेड ब्रेक कॅलिपर, 16-इंच ब्लॅक अलॉयसह येतो. या कारमध्ये अन्य महत्वाचे फीचर्स सुद्धा देण्यात आले आहे.
हे देखील वाचा: फक्त भारतातच नाही तर जगभरात ‘या’ कंपनीच्या बाईक्सना असते मागणी, विकतात लाखो युनिट्स
कंपनीने Virtus GT-Line मध्ये एक लिटर क्षमतेचे TSI इंजिन दिले आहे. ज्यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. याशिवाय GT Plus Sport मध्ये 1.5 लिटर क्षमतेचे TSI पेट्रोल इंजिन आहे. यात 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड डीसीटी गिअरबॉक्स आहे.
फोक्सवॅगनने Virtus GT Line भारतीय बाजारपेठेत 14.07 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच केली आहे. तर Virtus GT Plus Sport ला 17.84 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत आणले आहे.