फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र हे एक मोठे क्षेत्र आहे, ज्यावर आपली पकड ठेवण्यासाठी अनेक भारतीय आणि विदेशी कंपनीज आपल्या दमदार बाईक्स आणि कार्स मार्केटमध्ये आंत असतात. सध्या बदल्यात काळानुसार ग्राहकांची आपल्या बाईककडून असणारी अपेक्षा सुद्धा बदलत आहे. त्यामुळेच अनेक दुचाकी उत्पादक कंपनीज सुद्धा नवनवीन बाईक्स लाँच करत आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे होंडा.
होंडा ही जपानी दुचाकी उत्पादक कंपनी आहे जी आपल्या दमदार आणि परवडणाऱ्या किंमतीमुळे ओळखली जाते. ही कंपनी बाईक्ससोबतच स्कूटर्स सुद्धा ऑफर करते. नुकताच कंपनीचा मागील महिन्यातील म्हणजेच सप्टेंबर 2024 मधील सेल्स रिपोर्ट जरी करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया, विक्रीच्या बाबतीत सप्टेंबर २०२४ कंपनीसाठी कसा राहिला व गेल्या महिन्यात त्यांनी किती युनिट्सची विक्री केली.
Honda ने सप्टेंबर 2024 मध्ये देशात आणि जगात 583633 दुचाकी वाहनांची विक्री केली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 11 टक्के अधिक वाहनांची विक्री झाली आहे.
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात 536391 युनिट्सची विक्री झाली आहे. होंडाने 47242 मोटारींची निर्यात केली आहे. आकडेवारीनुसार, देशांतर्गत बाजारपेठेत वर्षभरात 9 टक्के आणि निर्यातीत 34 टक्के वाढ झाली आहे.
हे देखील वाचा: September 2024 ठरला Hero Motocorp साठी फायदेशीर, विकल्या तब्बल ‘इतके’ युनिट्स
होंडाने माहिती दिली आहे की एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2024 दरम्यान देशांतर्गत बाजारात एकूण 2881419 युनिट्सची विक्री झाली असून 276958 युनिट्सची निर्यात करण्यात आली आहे.
होंडा भारतीय बाजारपेठेत 100 सीसी सेगमेंटपासून प्रीमियम सेगमेंटपर्यंतच्या बाईक्स विकत असते. यामध्ये Honda Shine 100, CD110 Dlx, Livo, Shine 125, SP125, Unicorn, SP160, Hornet 2.0, CB 200X, CB 350, NX 500, XL 750 Transcalp, Gold Wing Tour यांचा समावेश आहे. तर स्कूटर सेगमेंटमध्ये कंपनी Honda Dio, Activa, Dio 125 आणि Activa 125 सारखे पर्याय ऑफर करते.