फोटो सौजन्य: Social Media
भारतात सध्या अनेक इलेक्ट्रिक कार लाँच होताना दिसत आहे. सध्याच्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक जण या इलेक्ट्रिक कार्सला चांगली मागणी मिळत आहे. तसेच येणार काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज आपल्या आगामी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे.
दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल निर्माता कंपनी किया मोटर्सने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दोन प्रीमियम कार लाँच केल्या आहेत. Kia Carnival सोबत, कंपनीने Kia EV9 देखील इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये लाँच केली आहे. चला या कारबद्दल अधिक जाणून घेऊया.
Kia ने आपली इलेक्ट्रिक SUV EV9 भारतीय बाजारात लाँच केली आहे. ही कंपनीची भारतातील सर्वात महागडी कार असणार आहे. ही कार Kia ची दुसरी इलेक्ट्रिक कार आहे, जी भारतात लाँच करण्यात आली आहे. याआधी कंपनीने फक्त EV6 विक्रीसाठी उपलब्ध करून दिली होती.
Kia EV9 मध्ये कंपनीने अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यात इलेक्ट्रिक अॅडजस्ट टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग व्हील आहे. ज्यासोबत मेमरी फंक्शन देण्यात आले आहे. याशिवाय ड्रायव्हिंगसाठी अनेक मोड्स आणि टेरेन मोडही देण्यात आले आहेत. या SUV मेमरी फंक्शनसह 18 वी ड्रायव्हर पॉवर सीट, 12 वी फ्रंट पॅसेंजर पॉवर सीट, दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट्स, मसाज सीट्स, आणि अन्य फीचर्स समाविष्ट आहे.
हे देखील वाचा: बाप रे! ‘ही’ बाईक देते 102 किलोमीटरचा मायलेज, आता होईल बचतच बचत
कंपनीने Kia EV9 मध्ये 99.8 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. यामुळे 350 KW चा चार्जर 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 24 मिनिटे लागतात. त्यात बसवलेल्या मोटरमधून या एसयूव्हीला 384.23 पीएस पॉवर आणि 700 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. या एसयूव्हिला 0-100 किमी वेगाने धावण्यासाठी फक्त 5.3 सेकंद लागतात. एआरएआय-एमआयडीसीनुसार, ही कार एका चार्जवर ते 561 किलोमीटरपर्यंत चालवता येते.
EV9 Kia ने CBU म्हणून आणले आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या GTL-AWD व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.30 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.