फोटो सौजन्य: @ChinaDriven/X.com
जागतिक ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. यातही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना जशी भारतात मागणी आहे तशीच विदेशात सुद्धा मागणी आहे. म्हणूनच तर अनेक विदेशी कंपनी जागतिक स्तरावर हाय परफॉर्मन्स एसयूव्ही ऑफर करत असतात.
युरोपची प्रमुख वाहन उत्पादक कंपनी Volvo ने आता त्यांची नवीन एसयूव्ही सादर केली आहे. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये वाहने ऑफर करणाऱ्या व्होल्वो कंपनीने व्होल्वो XC70 ही नवीन SUV म्हणून सादर केली आहे. ही SUV प्रथम कोणत्या देशात सादर केली गेली आहे? त्यात कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले गेले आहेत? ती भारतात लाँच केली जाऊ शकते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात.
Tata Harrier EV चा ‘हा’ फिचर सुरु झाला अन् होत्याचं नव्हतं झालं! अगदी काही सेकंदातच गमावला जीव
व्होल्वोने आपल्या नवीन एसयूव्हीच्या रूपात Volvo XC70 सादर केली आहे. कंपनीने ही कार सर्वप्रथम चीनच्या ऑटो बाजारात सादर केली आहे.
मीडिया अहवालानुसार, या एसयूव्हीमध्ये पेट्रोल इंजिनसोबत हायब्रिड तंत्रज्ञान देण्यात आले आहे. त्यामुळे ही कार एका फुल चार्जवर तब्बल 1200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापू शकते. यातील फक्त इलेक्ट्रिक रेंजच 200 किलोमीटरहून अधिक आहे. याशिवाय, यात ऑल-व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञानाची सुविधाही दिली जाणार आहे.
चीनमध्ये सादर केलेल्या व्होल्वो XC70 मध्ये अनेक उत्तम फीचर्स असतील. त्यात LED हेडलाइट्स, LED C-आकाराचे DRL, फ्लश डोअर हँडल, नवीन अलॉय व्हील्स, 12-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 15.4 -इंच डिस्प्ले, वायरलेस चार्जर, हेड-अप डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ असे अनेक फीचर्स असतील.
फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर खरेदी करा Nissan Magnite SUV चा CNG व्हेरिएंट, एवढाच असेल EMI?
कंपनीने नुकतेच ही कार चीनमध्ये सादर केली आहे. या कारची नेमकी किंमत लाँच झाल्यानंतरच दिली जाईल. मात्र, अशी आशा आहे की या कारची किंमत सुमारे 1 कोटी रुपयांच्या किमतीत लाँच केली जाऊ शकते.
व्होल्वोने ही एसयूव्ही चीनमध्ये सादर केली आहे. यासोबतच, इतर देशांमध्येही ही एसयूव्ही लाँच करण्याच्या शक्यतांवर काम केले जात आहे. अशा परिस्थितीत, पुढील वर्षी भारतात ही कार लाँच होण्याची अपेक्षा आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.