फोटो सोजन्य: @chandan_stp/ X.com
बदलत्या काळानुसार अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या कारमध्ये विविध तंत्रज्ञानाने सुसज्ज असे फीचर्स समाविष्ट करत आहे. या आधुनिक कार्सना मार्केटमध्ये ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इलेक्ट्रिक कारमध्ये देखील काही चांगले फीचर्स पाहायला मिळत आहे. मात्र या आधुनिक फीचर्सचे जसे फायदे आहेत, तसे तोटे देखील आहेत.
अलिकडच्या काळात येणाऱ्या कारमध्ये अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळत आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे नवीन टाटा हॅरियर ईव्ही, जी अनेक फीचर्सनी परिपूर्ण आहे ही कार जून 2025 मध्ये लाँच करण्यात आली आहे. त्यातील एक खास फीचर्स म्हणजे Summon mode. हे एक ऑटोनॉमस फिचर आहे, हे फिचर ड्रायव्हरच्या सीटवर कोणीही नसताना थोड्या अंतरासाठी कारला रिमोटली कॉल करण्याची परवानगी देते. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात या समन मोड्समुळे एका व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Tata harrier क़ी गाड़ी मे तकनीकी खराबी ने एक क़ी जान ले ली
अपने आप रिवर्स मे चलने लगी pic.twitter.com/w1Vk7pzbiS— chandan (@chandan_stp) August 23, 2025
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात Harrier EV एका तरुणावरू जाताना दिसत आहे. ही घटना तमिळनाडूतील अविनाशी येथील असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात पीडित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. व्हिडिओमध्ये कार उतारावरून घसरत खाली येताना दिसते, तर दरवाजा उघडल्यावरही चालक कारमध्ये बसू शकला नाही. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना १४ ऑगस्ट २०२५ रोजी घडली आहे.
या पोस्टनुसार, त्या व्यक्तीने कारमध्ये शिरून ब्रेक दाबून कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, SUV च्या जोरामुळे तो बाहेर ओढला गेला आणि जमिनीवर पडून डोक्याला गंभीर इजा झाली. मागे सरकताना वाहन त्याच्या पायांवरून गेले.
घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पीडित कुटुंब अजूनही धक्क्यात आहे. त्यांनी टाटा मोटर्सविरोधात अधिकृत तक्रार अद्याप दाखल केलेली नाही. कंपनीने मात्र कार ताब्यात घेतली आहे. या दुर्दैवी अपघाताचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा इतर कोणतेही बाह्य कारण यांपैकी नेमके काय आहे, याचा शोध सुरू आहे.
या घटनेबाबत टाटा मोटर्सने अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, या दुर्दैवी अपघाताची माहिती आम्हाला मिळाली असून आम्ही या घटनेमुळे अत्यंत व्यथित आहोत. आमच्या संवेदना मृतकाच्या कुटुंबासोबत आहेत. सध्या आम्ही सर्व संबंधित माहिती गोळा करत आहोत. सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडिओंच्या पाहणीनुसार, कार उतारामुळे मागे घसरले असावे आणि एखाद्या अज्ञात वस्तूवर आदळून परत पुढे सरकले असावे. यावरून असे दिसते की कारमधील मोटर सुरू नव्हती. वाहन अद्याप त्या कुटुंबाकडेच आहे आणि घटनेनंतर त्याचा वापर झालेला आहे. आम्हाला अजून त्याची तपासणी करण्याची संधी मिळालेली नाही.”