Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतात राजा, हायवेवर वजीर! ट्रॅक्टर चालवण्यासाठी ‘स्पेशल’ लायसन्स लागतं का? जाणून घ्या कायदेशीर नियम

शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर वापरताना साधं लायसन्स चालतं, पण व्यावसायिक मालवाहतुकीसाठी 'ट्रान्सपोर्ट' लायसन्स व पिवळी नंबर प्लेट अनिवार्य आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास आरटीओ दंड होऊ शकतो आणि अपघाताच्या वेळी विम्याचा क्लेम नाकारला जाऊ शकतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 02, 2026 | 03:08 PM
शेतात राजा, हायवेवर वजीर! ट्रॅक्टर चालवण्यासाठी ‘स्पेशल’ लायसन्स लागतं का? जाणून घ्या कायदेशीर नियम
Follow Us
Follow Us:

भारतामध्ये शेती आणि ट्रॅक्टर यांचं एक अतुट नातं आहे. शेतातील नांगरणीपासून ते बाजारात शेतीमाल नेण्यापर्यंत ट्रॅक्टर हा शेतकऱ्याचा खरा सोबती असतो. पण, जेव्हा हाच ट्रॅक्टर शेतातून निघून डांबरी रस्त्यावर किंवा हायवेवर येतो, तेव्हा आरटीओचे नियम काय सांगतात? ट्रॅक्टर चालवण्यासाठी साधं लायसन्स चालतं की ट्रान्सपोर्ट लायसन्स लागतं? अनेक शेतकऱ्यांच्या मनात याबद्दल संभ्रम असतो. चला तर मग, यातील कायदेशीर फरक सोप्या भाषेत समजून घेऊया,

१. शेतात ट्रॅक्टर चालवणे: नियम काय सांगतो?

कायद्यानुसार, जर तुम्ही ट्रॅक्टर फक्त तुमच्या स्वतःच्या खाजगी शेतजमिनीत चालवत असाल, तर तिथे ट्रॅफिकचे नियम लागू होत नाहीत. शेतात ट्रॅक्टर चालवताना कोणतीही पोलीस कारवाई किंवा आरटीओची तपासणी होत नाही. पण, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि अपघात टाळण्यासाठी ट्रॅक्टर चालवणाऱ्या व्यक्तीला गाडी चालवण्याचा अनुभव आणि मूलभूत ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे.

RC बुकवरील ‘इंजिन नंबर’ आणि ‘चेसिस नंबर’ का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या

२. हायवेवर ट्रॅक्टर आणणे: ‘साधं’ लायसन्स की ‘ट्रान्सपोर्ट’?

सगळ्यात महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न म्हणजे रस्त्यावर ट्रॅक्टर आणताना कोणते लायसन्स हवे? याचे उत्तर ट्रॅक्टरच्या वापरावरून ठरते,

  • साधं लायसन्स (नॉन-कमर्शियल): जर तुमचा ट्रॅक्टर ‘शेती कामासाठी’ नोंदणीकृत असेल आणि तुम्ही त्याचा वापर स्वतःच्या शेतातील माल, खते किंवा बी-बियाणांची वाहतूक करण्यासाठी करत असाल, तर तुम्हाला LMV (Light Motor Vehicle) किंवा ट्रॅक्टरसाठीचे विशेष साधं लायसन्स पुरेसे असते. यासाठी ट्रॅक्टरला पांढरी नंबर प्लेट असणे आवश्यक आहे.
  • ट्रान्सपोर्ट लायसन्स (कमर्शियल): जर तुम्ही ट्रॅक्टरचा वापर व्यावसायिक कामासाठी करत असाल, जसे की वीटभट्टीवरील विटा वाहणे, वाळू-दगड वाहतूक करणे, किंवा इतरांचे बांधकाम साहित्य भाड्याने वाहून नेणे, तर तो ट्रॅक्टर ‘कमर्शियल’ मानला जातो. अशा वेळी चालकाकडे ‘ट्रान्सपोर्ट’ किंवा ‘कमर्शियल’ ड्रायव्हिंग लायसन्स असणे सक्तीचे आहे. या ट्रॅक्टरची नंबर प्लेट ही पिवळ्या रंगाची असते.
‘परिवहन’ मोबाईल ॲप आपल्याला कोणकोणत्या सुविधा देते? जाणून घ्या

३. कायदेशीर फरक आणि दंड

अनेकदा शेतीच्या नावावर नोंदणी असलेला ट्रॅक्टर व्यावसायिक कामासाठी वापरला जातो. ट्रॅफिक पोलिसांनी किंवा आरटीओने जर शेतीच्या ट्रॅक्टरमध्ये व्यावसायिक मालाची वाहतूक करताना पकडले, तर मोठा दंड होऊ शकतो. विना-लायसन्स किंवा चुकीच्या लायसन्सवर ट्रॅक्टर चालवल्यास इन्शुरन्स क्लेम देखील नाकारला जाऊ शकतो.

थोडक्यात सांगायचं तर, स्वतःच्या शेतीसाठी साधं लायसन्स चालतं, पण व्यावसायिक भाडेतत्वावर काम करायचे असल्यास ‘कमर्शियल’ लायसन्स आणि पिवळी नंबर प्लेट असणे कायद्याने बंधनकारक आहे.

Web Title: What type of license does tractor drivers needs auto sector news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

RC बुकवरील ‘इंजिन नंबर’ आणि ‘चेसिस नंबर’ का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या
1

RC बुकवरील ‘इंजिन नंबर’ आणि ‘चेसिस नंबर’ का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या

RC बुक हरवले तर काय करावे? ‘डुप्लिकेट RC’ मिळवण्याची ऑनलाईन व ऑफलाईन सोपी प्रक्रिया काय आहे?
2

RC बुक हरवले तर काय करावे? ‘डुप्लिकेट RC’ मिळवण्याची ऑनलाईन व ऑफलाईन सोपी प्रक्रिया काय आहे?

किया इंडियाने लाँच केले सेल्टोसचे २ नवीन व्हेरिएंट्स; २१.५६ लाख रुपयांपासून किंमत सुरू!
3

किया इंडियाने लाँच केले सेल्टोसचे २ नवीन व्हेरिएंट्स; २१.५६ लाख रुपयांपासून किंमत सुरू!

CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाचे! दर तीन वर्षांनी CNG सिलेंडरची ‘हायड्रो-टेस्टिंग’ करणे अनिर्वार्य! ‘हे’ चुकवले तर बेतू शकते जीवावर
4

CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाचे! दर तीन वर्षांनी CNG सिलेंडरची ‘हायड्रो-टेस्टिंग’ करणे अनिर्वार्य! ‘हे’ चुकवले तर बेतू शकते जीवावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.