Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एखादी गाडी रस्त्यावर धावण्यास योग्य आहे हे कोण ठरवते? भारताची क्रॅश टेस्ट रेटिंग देणारी प्रणाली कशी काम करते? जाणून घ्या

भारतात वाहन रस्त्यावर धावण्यास पात्र आहे की नाही हे ARAI आणि ICAT या अधिकृत सरकारी संस्था ठरवतात. देशातील वाहनांच्या सुरक्षेची पातळी मोजण्यासाठी 'भारत NCAP' ही यंत्रणा विविध क्रॅश चाचण्यांच्या आणि डमी सेन्सर्सच्या आधारे वाहनांना १ ते ५ स्टार रेटिंग देते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 17, 2026 | 07:05 AM
एखादी गाडी रस्त्यावर धावण्यास योग्य आहे हे कोण ठरवते? भारताची क्रॅश टेस्ट रेटिंग देणारी प्रणाली कशी काम करते? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

गाडी रस्त्यावर धावण्यास योग्य आहे हे कोण ठरवते?

भारतात कोणतीही नवीन गाडी प्रत्यक्ष रस्त्यावर आणण्यापूर्वी ती सर्व निकषांवर खरी उतरते की नाही, हे तपासण्याची आणि प्रमाणित करण्याची जबाबदारी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या अधिकृत संस्थांकडे असते. यामध्ये प्रामुख्याने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) या संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात.

या संस्थांद्वारे वाहनाची ‘होमोगोलेशन’ म्हणजेच सर्व तांत्रिक तपासणी केली जाते. यामध्ये गाडीचे इंजिन, उत्सर्जनाची पातळी, ब्रेक, दिवे, स्टेअरिंग, टायर आणि इतर सर्व सुरक्षा घटकांची कठोर चाचणी घेतली जाते. सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाल्यावरच त्या गाडीला रस्त्यावर धावण्यासाठी कायदेशीर मंजुरी दिली जाते.

2G Ethanol : आता पिकांच्या अवशेषांपासून बनणार 2जी इथेनॉल; इंधन संकटाचा कायमचा शेवट, जाणून घ्या ‘हे’ नवे तंत्रज्ञान

भारताची क्रॅश टेस्ट रेटिंग प्रणाली (भारत NCAP) कशी काम करते?

भारताने स्वतःची स्वतंत्र वाहन सुरक्षा मूल्यांकन प्रणाली सुरू केली आहे, ज्याला भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एनसीएपी) असे म्हटले जाते. ही सिस्टीम पूर्णपणे जागतिक मानकांवर आधारित असून पुढील टप्प्यांत काम करते,

  • गाड्यांची निवड: वाहन उत्पादक कंपन्या स्वतःहून त्यांच्या गाड्या या चाचणीसाठी पाठवतात. बहुतांश वेळा वाहनांचे मूळ किंवा सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल चाचणीसाठी निवडले जाते.
  • कठोर क्रॅश चाचण्या: प्रयोगशाळेत नियंत्रित वातावरणात वाहनांच्या वेगवेगळ्या क्रॅश चाचण्या घेतल्या जातात. यामध्ये ताशी ६४ किलोमीटर वेगाने समोरून होणारी धडक, ताशी ५० किलोमीटर वेगाने बाजूने होणारी धडक आणि खांबाला होणारी धडक अशा विविध प्रकारच्या अपघातांचे प्रसंग निर्माण केले जातात.
  • डम्मीद्वारे मापन: गाडीच्या आत मानवी आकाराचे कृत्रिम पुतळे (डम्मी) बसवले जातात, ज्यांच्यामध्ये हाय-टेक सेन्सर्स असतात. अपघाताच्या वेळी डोके, छाती आणि पायांवर किती दाब किंवा इजा होते, याचे अचूक मोजमाप हे सेन्सर्स करतात.
  • मूल्यमापनाचे तीन मुख्य निकष,
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! जुनी वाहने स्क्रॅप होणार; ५०४१ कोटींचा मेगा प्लॅन मंजूर

१. प्रौढ प्रवाशांचे संरक्षण: अपघातात मोठ्या माणसांचा जीव किती सुरक्षित राहतो.

२. बाल प्रवाशांचे संरक्षण: लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या यंत्रणा किती प्रभावी आहेत.

३. सुरक्षा साहाय्य तंत्रज्ञान: गाडीमध्ये असणारे एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि सीटबेल्ट रिमाइंडर यांसारखे सुरक्षा फीचर्स.

  • स्टार रेटिंग: या सर्व निकषांवर मिळालेल्या गुणांची बेरीज करून वाहनांना १ ते ५ स्टार दरम्यान रेटिंग दिले जाते. जितके जास्त स्टार, तितकी ती गाडी अपघातात अधिक सुरक्षित मानली जाते.

Web Title: Who approves roadworthy cars in india automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • automobile
  • Car

संबंधित बातम्या

अँपिअरच्या ‘Built for Bharat’ची चर्चा! या आहेत अँपिअरच्या 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स, कोणती ठरेल तुमच्यासाठी योग्य?
1

अँपिअरच्या ‘Built for Bharat’ची चर्चा! या आहेत अँपिअरच्या 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स, कोणती ठरेल तुमच्यासाठी योग्य?

दक्षिण कोरियाला मागे टाकत भारत बनला ह्युंदाईचा जगातील दुसरा सर्वात मोठा मार्केट
2

दक्षिण कोरियाला मागे टाकत भारत बनला ह्युंदाईचा जगातील दुसरा सर्वात मोठा मार्केट

कारच्या धुरावरच नाही, ब्रेक-टायरच्या प्रदूषणावरही कडक नियम! BS-7 नियमांमुळे कार कंपन्यांची चिंता वाढणार?
3

कारच्या धुरावरच नाही, ब्रेक-टायरच्या प्रदूषणावरही कडक नियम! BS-7 नियमांमुळे कार कंपन्यांची चिंता वाढणार?

2029 पर्यंत जीप आणि सिट्रोएनचे 12 नवीन मॉडेल्स येणार भारतात! स्टेलांटिसची भारतात 4,000 कोटींची गुंतवणूक!
4

2029 पर्यंत जीप आणि सिट्रोएनचे 12 नवीन मॉडेल्स येणार भारतात! स्टेलांटिसची भारतात 4,000 कोटींची गुंतवणूक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.