Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yezdi Roadster 2026 : हॉकीचा माजी कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या ताफ्यात नवी ‘येझदी’! ग्रीन मांबा रोडस्टरच्या लुकने जिंकले मन

Yezdi Roadster 2026 : भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार आणि ऑलिम्पिक पदकविजेता पी. आर. श्रीजेशने नुकतीच नवीन '२०२६ येझदी ग्रीन मांबा रोडस्टर' खरेदी केली असून, या मोटारसायकलची डिलीव्हरी घेणारा तो भारतातील पहिला ग्राहक ठरला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 12, 2026 | 04:08 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हॉकीचा माजी कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या ताफ्यात नवी ‘येझदी’!
  • ग्रीन मांबा रोडस्टरच्या लुकने जिंकले मन
  • २०२६ येझदी रोडस्टरची पहिली डिलीव्हरी संपन्न
Yezdi Roadster 2026 :  जावा येझदी मोटारसायकल्सने आज त्यांच्या नुकत्याच सादर केलेल्या 2026 येझदी ( Yezdi Roadster 2026 ) सिरीजसाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, ऑलिम्पिक पदकविजेता आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार पीआर श्रीजेश हा या नव्या येझदी ग्रीन मांबा रोडस्टरची डिलीव्हरी घेणारा भारतातील पहिला ग्राहक ठरला आहे.

The Royal Rajputana Classic Rally:  राजस्थानच्या ऐतिहासिक गाड्यांचा आणि राजेशाही वारशाचा अनोखा उत्सव

येझदी रोडस्टर अगदी परफेक्ट पर्याय

केरळमधील नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लाँचमध्ये नव्या येझदी सिरीजचा अनुभव घेतल्यानंतर, श्रीजेश ग्रीन मांबा रोडस्टरच्या वेगळ्या डिझाइन आणि दमदार लुककडे आकर्षित झाला. जिद्द, आत्मविश्वास आणि लढवय्या वृत्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूसाठी येझदी रोडस्टर अगदी परफेक्ट पर्याय ठरला.

भन्नाट फीचर्स

खास मॅट-ग्रीन शेड, त्याला साजेशी क्विल्टेड अरेबिका-ब्राऊन सीट आणि सिग्नेचर कॉपर डिकल्सने नटलेली ही ग्रीन मांबा रोडस्टर रस्त्यावर एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठीच बनवली आहे. 334-सीसी लिक्विड-कुल्ड अल्फा 2 इंजिन, सिक्स-स्पीड गिअरबॉक्स, असिस्ट-अँड-स्लिपर क्लच, ABS आणि मॉड्युलर सीटिंगसह सज्ज असलेली ही मोटारसायकल आधुनिक क्षमता आणि येझदीच्या परंपरेचा तोच रुबाबदार अंदाज यांचा उत्तम मेळ साधते.

येझदीच्या मोठ्या कुटुंबात आणखी एक महत्त्वाचा टप्पा

श्रीजेश ग्रीन मांबा रोडस्टरचा पहिला ग्राहक बनल्याने येझदीच्या मोठ्या कुटुंबात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे. वाढते रिटेल नेटवर्क आणि रायडर्सच्या वाढत्या कम्युनिटीच्या जोरावर, भारताच्या वेगाने बदलणाऱ्या मिड-कपॅसिटी मोटारसायकल सेगमेंटमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्यावर येझदीचा भर आहे.

येझदी ग्रीन मांबा रोडस्टरने माझे लक्ष वेधलं

या प्रसंगी बोलताना पीआर श्रीजेश म्हणाले, “माझा नेहमीच असा विश्वास राहीला आहे की, मैदानाबाहेरचे आयुष्यही तितकेच महत्त्वाचे असते जितके मैदानावर घडणारे. कोचीमधील लाँचच्या वेळी पाहिल्या क्षणीच येझदी ग्रीन मांबा रोडस्टरने माझे लक्ष वेधून घेतले होते; तिच्या डिझाइन, स्वभाव आणि ॲटिट्यूडमध्ये असे काहीतरी होते जे माझ्या मनात घर करून राहिले. येझदीला एक असा वारसा आहे ज्याबद्दल पिढ्यानपिढ्या रायडर्स बोलत आले आहेत आणि मलाही त्या गोष्टीचा एक भाग व्हायचे होते. ही मोटारसायकल तुम्हाला आकर्षित करणाऱ्या गोष्टींचा पाठलाग करत राहण्याची आठवण करून देते, मग ते मैदानावर असो, रस्त्यावर असो किंवा आयुष्यात.”

क्रीडा जगतातील एका महान खेळाडूने पहिला ग्राहक

क्लासिक लिजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “आजच्या येझदीची जी काही ओळख आहे. ती म्हणजे तिचा रुबाबदार अंदाज, आत्मविश्वास आणि लढवय्या वृत्ती ते सर्वच या रोडस्टरमध्ये दिसते. श्रीजेशसारख्या क्रीडा जगतातील एका महान खेळाडूने पहिला ग्राहक म्हणून आमची गाडी निवडली, याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्यांचा हा प्रवास जिद्द, धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, ज्या मूल्यांवर आमच्या ब्रँडचाही गाढ विश्वास आहे. 2026 ची नवी सिरीज आता देशभरातील रायडर्सपर्यंत पोहोचू लागली आहे, अशा वेळी या मूल्यांना खऱ्या अर्थाने जगणाऱ्या व्यक्तीसोबत रोडस्टरचा हा प्रवास सुरू होताना पाहणे खूपच आनंददायी आहे.”

पीआर श्रीजेश ग्रीन मांबा रोडस्टरचे पहिले ग्राहक ठरल्यामुळे, आता येझदीच्या 2026 सिरीजची संपूर्ण भारतात डिलीव्हरी सुरू होत आहे.

गोव्यातील ‘इंडिया बाईक वीक’ काही असा साजरा केलं जातो! पाहा या धमाकेदार ऑटो फेस्टिवलचे आजपर्यंतचे काही विलक्षण क्षण

Web Title: Yezdi roadster 2026 pr sreejesh take delivery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • automobile
  • automobile news
  • Hockey
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
3

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
4

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.