फोटो सौजन्य: iStock
भारतात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचे प्रमाण वाढत आहे, याचे कारण आहे, Conventional Internal Combustion Engine (ICE) तुलनेत यातून होणारा मूल्य लाभ. वाहन खरेदी करताना थोडी जास्त किंमत द्यावी लागत असली, तरी त्यातून होणारे दीर्घकालीन फायदे पाहता शाश्वत आणि किफायतशीर मोबिलिटी सोल्यूशन्सच्या शोधात असणाऱ्या खरेदीदारांसाठी ईव्ही अधिक चांगला पर्याय ठरतो. त्यात भारतीय ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना एवढी डिमांड का मिळत आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.
इलेक्ट्रिक वाहनांच्या मालकीसंबंधी खर्चाचा आढावा घेतल्यास, विविध स्तरांवर लक्षणीय बचत स्पष्ट होते. नेक्सॉन.ईव्ही सारख्या मॉडेल्समुळे संपादन खर्च स्पर्धात्मक झाला आहे, कारण बॅटरीच्या किंमती कमी होत आहेत. पेट्रोल, डिझेल, हायब्रिड आणि CNG वाहनांच्या तुलनेत इव्ही अधिक फायदेशीर ठरतात.
ईव्ही चार्जिंग हे इंधन भरण्यापेक्षा स्वस्त असून, हालचाल करणारे पार्टस कमी असल्याने मेंटेनन्स खर्चही कमी असतो. रूफटॉप सोलर सिस्टम वापरल्यास चार्जिंगचा खर्च जवळपास शून्यावर येतो, जे एक अतिरिक्त आर्थिक लाभ आहे.
२०२४ मध्ये EV विक्रीत 22% वाढ झाली असून, एकूण 19 लाख युनिट्स विकल्या गेल्या आहेत. ही वाढ उपभोक्त्यांच्या वाढत्या विश्वासासोबतच सरकारी धोरणांनीही गती घेतली आहे.
प्रीमियम हायब्रिड आणि CNG पर्यायांच्या तुलनेत इव्ही कमी खर्चिक, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक असल्याने ग्राहकांची निवड झपाट्याने इव्हीकडे वळत आहे.
इव्हीचा आणखी एक उल्लेखनीय फायदा म्हणजे त्यांची क्षमता आणि इंधनाचा कमी खर्च. विशेषतः पेट्रोल आणि डिझेलसारख्या पारंपरिक इंधनाशी तुलना केल्यास, प्रति किलोमीटर कमी ऊर्जा खर्चासह इव्ही उठून दिसतात.
आपल्या मालकीची इव्ही असल्याचा एक मोठा फायदा म्हणजे दैनंदिन संचालन खर्चातील लक्षणीय घट. इंधनाचा खप आणि देखभालीचे तपशील तपासल्यास हे स्पष्ट होईल.
हेल्मेट म्हणजे बॅक्टेरियांचं घर! योग्य काळजी न घेतल्यास होऊ शकतो गंभीर त्वचा विकार
नेक्सॉन.इव्हीसाठी दैनिक इंधनाचा खर्च केवळ ४३.६२ रु. आहे, जो पेट्रोल वाहनासाठी ३०३.२९ रु. आणि समकक्ष डिझेल वाहनासाठी १९१.३४ रु. आहे. येथेच इव्हीचा मोठा आर्थिक फायदा नजरेत भरतो. यानुसार, इंधनाचा वार्षिक खर्च नेक्सॉन.ईव्हीसाठी १५,७०३ रु. होतो तर पेट्रोल आणि डिझेल गाड्यांसाठी अनुक्रमे १,०९,१८४ रु. आणि ६८,८८३ रु. होतो. सीएनजीसाठी हा खर्च ५४,३३२ रु. होतो.
इतर वाहनांच्या व्हेरियंटच्या तुलनेत नेक्सॉन. ईव्हीचा वार्षिक ऑपरेटिंग कॉस्ट लक्षणीयरित्या कमी आहे. पाच वर्षाच्या वापरात हा फरक अधिक स्पष्ट होतो. नेक्सॉन.ईव्हीसाठी पाच वर्षांचा एकूण खर्च १,७७,४५८ रु. होतो तर त्याच्या तुलनेत पेट्रोलसाठी तो ६,५०,९१२ रु., डिझेलसाठी ४,५६,४०४ रु., हायब्रिडसाठी ४,७३,९४७ रु. आणि सीएनजीसाठी ३,७८,६२५ रु. होतो.