भारतातील या श्रीमंत व्यक्तीने दारात उभी केली Tesla Cybertruck, किमतीच्या बाबतीत Toyota Fortuner पेक्षाही वरचढ
भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक उत्तम वाहन उत्पादक कंपन्या आहेत. तसेच देशातील ऑटो इंडस्ट्री देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशावेळी आपला दबदबा निर्माण करण्यासाठी अनेक विदेशी ऑटो कंपन्या मार्केटमध्ये एंट्री मारत असतात. आता तर जगात आपल्या कार्सच्या जोरावर डंका वाजवणारी Tesla कंपनी भारतीय मार्केटमध्ये आपले पाऊल ठेवणार आहे. नुकतेच भारतीय रस्त्यावर टेस्लाची कार स्पॉट झाली आहे. आता Tesla Cybertruck भारतातील एका उद्योगपतीने खरेदी केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
सुरतचे प्रसिद्ध उद्योगपती आणि रिअल इस्टेट व्यावसायिक लवजी बादशाह यांनी देशातील पहिला टेस्ला सायबरट्रक ऑर्डर केला आहे. यानिमित्ताने ते या वाहनाचे पहिले भारतीय मालक झाले आहेत. हा सायबर ट्रक अमेरिकेतून दुबई आणि नंतर सुरत मार्गे मुंबईत पोहोचला आहे. टेस्ला सायबरट्रकची अंदाजे किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे, जी जाणून सगळेच थक्क झाले आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्ती, राज्य सरकारकडून नवं ईव्ही धोरण मंजूर
एलोन मस्कने पहिल्यांदा 2019 मध्ये टेस्ला सायबरट्रक सादर केला होता आणि याचे उत्पादन 2023 मध्ये सुरू झाले. हे इलेक्ट्रिक वाहन 2.9 सेकंदात 0 ते 60 मैल प्रतितास वेग पकडू शकतो आणि त्याची रेंज सुमारे 500 किमी आहे. अमेरिकेत या वाहनाची सुरुवातीची किंमत $60,990 आहे, याची भारतीय चलनातील किंमत 50.7 लाख रुपयांच्या बरोबर आहे. भारतात हे वाहन आणण्याचा खर्च आणि इम्पोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी इत्यादींचा समावेश करून, याची किंमत सुमारे 3 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या ट्रकवर लवजी बादशाहने त्याच्या घराचे नावही लिहिले आहे.
लवजी बादशाह यांनी सांगितले की, सायबरट्रक भारतात आणणे सोपे काम नव्हते. हे वाहन दुबईहून मुंबई आणि नंतर सुरतला आणण्यासाठी अनेक प्रक्रियातून जावे लागले.
हेल्मेट म्हणजे बॅक्टेरियांचं घर! योग्य काळजी न घेतल्यास होऊ शकतो गंभीर त्वचा विकार
टेस्ला सायबरट्रकच्या इंटिरिअरमध्ये सहा लोक सहज बसू शकतात. केबिनमध्ये एक मोठी 17-इंच टचस्क्रीन आहे, जी टेस्लाच्या नवीनतम सॉफ्टवेअरने सुसज्ज आहे. फ्यूचरिस्टिक डॅशबोर्ड डिझाइन एखाद्या स्पेसशिपच्या कॉकपिटसारखे वाटते. हे टेस्लाच्या अॅडव्हान्स फुल सेल्फ-ड्रायव्हिंग (FSD) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग अनुभव सुधारते. इतर फीचर्समध्ये 15-स्पीकर साउंड सिस्टम, मल्टी-झोन ऑटोमॅटिक एसी, वायरलेस फोन चार्जिंग आणि एअर प्युरिफायर यांचा समावेश आहे.
Tesla Cybertruck हे पूर्णपणे ऑटोमॅटिक वाहन आहे, जे मध्यवर्ती स्क्रीनद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. सायबरट्रक फक्त 2.7 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडते.