
फोटो सौजन्य: Gemini
भारतात अनेक अशा ऑटो कंपन्या आहेत, ज्या फक्त आपल्या देशात नाही तर विदेशात सुद्धा दमदार कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे टोयोटा मोटर्स. ही कंपनी नेहमीच त्यांच्या दमदार कार्ससाठी ओळखली जाते. कंपनीने बजेट फ्रेंडली वाहनांसोबतच लक्झरी सेगमेंटमध्ये सुद्धा उत्तम कार ऑफर केल्या आहेत. अशीच कंपनी म्हणजे लँड क्रुझर.
अलीकडेच टोयोटा मोटर कॉर्पोरेशनने लँड क्रूझर FJ कॉम्पॅक्ट एसयूव्ही सादर केली. कंपनीच्या मते, हे नवीन मॉडेल 2026 च्या मध्यापर्यंत प्रथम जपानमध्ये लाँच केली जाईल. लँड क्रूझर एफजे ही एक कॉम्पॅक्ट आणि आधुनिक एसयूव्ही म्हणून डिझाइन केलेली आहे. चला या कारच्या फीचर्सवर एक नजर टाकूया.
Shankar Mahadevan ने खरेदी केली 69.90 लाख रुपयांची ‘ही’ आलिशान कार, फीचर्स तर एकदमच भारी
नव्या Land Cruiser FJ चं इंटिरिअर पूर्णपणे ड्रायव्हरच्या सोयीसुविधा आणि नियंत्रणावर आधारित आहे. यात दिलेला हॉरिझॉन्टल इन्स्ट्रुमेंट पॅनेल ड्रायव्हरला वाहनाचा झुकाव आणि बॅलन्स सहज समजून घेण्यास मदत करतो. लो बेल्टलाइन आणि खाली झुकलेला काउल यामुळे खडतर रस्त्यांवरसुद्धा उत्तम व्हिजिबिलिटी मिळते.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, या SUV मध्ये Toyota Safety Sense System देण्यात आलं आहे. या सिस्टिममध्ये Pre-Collision Safety, Lane Trace Assist, आणि Adaptive Cruise Control सारखे आधुनिक सेफ्टी फीचर्स आहेत, जे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि स्थिर करतात.
नवीन Land Cruiser FJ मध्ये 2.7-लीटर पेट्रोल इंजिन (2TR-FE) देण्यात आलं आहे, जे 163 BHP ची पॉवर आणि 246 Nm टॉर्क निर्माण करतं. हे इंजिन 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि Part-Time 4WD System सोबत येतं. याचा व्हीलबेस 2,580 mm इतका आहे, जो Land Cruiser 250 Series पेक्षा छोटा आहे. त्यामुळे SUV चा टर्निंग रेडियस फक्त 5.5 मीटर राहतो, ज्यामुळे ती वळवणं अतिशय सोपं होतं. टोयोटाच्या म्हणण्यानुसार, नव्या FJ मध्ये उत्कृष्ट ग्राउंड क्लीयरन्स आणि व्हील आर्टिक्युलेशन दिलं आहे, ज्यामुळे ती मूळ लँड क्रूझरची दमदार ऑफ-रोड क्षमता टिकवून ठेवते.
Amazon वरून Royal Enfield Hunter खरेदी केल्याने किती बचत होणार? जाणून घ्या किंमत
सध्या कंपनीकडून भारतातील लाँचबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र भारतातील वेगाने वाढणाऱ्या SUV मार्केटला पाहता, Land Cruiser FJ भारतात लाँच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशात असे अनेक ग्राहक आहेत जे मजबूत, टिकाऊ आणि ॲडव्हेंचर-रेडी SUV च्या शोधात असतात. जर टोयोटाने ही कार भारतात आणली, तर ती ऑफ-रोडिंग प्रेमी आणि SUV लव्हर्स यांच्यात झपाट्याने लोकप्रिय ठरू शकते.