फोटो सौजन्य: X.com
भारतात आलिशान कारची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. खासकरून अनेक सेलिब्रेटी मंडळी नेहमीच त्यांच्या कार कलेक्शनमध्ये लक्झरी कार्सचा समावेश करत असतात. भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या लक्झरी कार्स ऑफर करत आहेत. ब्रिटन वाहन निर्माता कंपनी MG सुद्धा एक लक्झरी कार ऑफर करत असते. ही कार म्हणजे MG M9. नुकतेच गायक शंकर महादेवन यांनी ही कार खरेदी केली आहे.
71.33 KM मायलेज देणाऱ्या ‘या’ Hybrid Scooter वर ग्राहक तुटून पडलेत, किंमत फक्त…
एमजी कंपनी अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असते. प्रीमियम सेगमेंटमध्ये ऑफर केली जाणारी MG M9 एमपीव्ही क्रिकेटपटू आणि बॉलिवूड स्टार्समध्ये लोकप्रिय होत आहे. गायक शंकर महादेवन यांनी अलीकडेच ही एमपीव्ही खरेदी केली आहे. चला या एमपीव्हीच्या फीचर्स, रेंज आणि किंमत याबद्दल माहिती घेऊयात
एमजी कंपनीकडून M9 ही एक लक्झरी इलेक्ट्रिक MPV म्हणून सादर केली गेली आहे. या कारमध्ये आरामदायी आणि प्रीमियम अनुभव देणारे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यात 16-वे अॅडजस्टमेंट, 8 मसाज ऑप्शन्स, वेंटिलेटेड आणि हीटेड सीट्स, तसेच इंटेलिजंट आर्मरेस्ट यांसारख्या सुविधा आहेत.
इंटीरियरमध्ये ब्राउन-सिल्व्हर-ब्लॅक थीम देण्यात आली असून सॉफ्ट-टच डॅशबोर्ड, वेगळे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅम्बिएंट लाइट्स, लेदरेट सीट्स, क्लायमेट कंट्रोल, दोन सिंगल पेन सनरूफ्स आणि पॅनोरॅमिक सनरूफचे पर्याय दिले गेले आहेत.
दुसऱ्या रांगेत दोन स्वतंत्र इन्फोटेनमेंट स्क्रीन्स देखील आहेत. एक्सटिरिअर डिझाइनकडे पाहिल्यास, इलेक्ट्रिक स्लायडिंग डोअर, LED DRL, LED हेडलाइट्स, ट्रॅपेजॉइडल मेश फ्रंट ग्रिल, LED टेल लाइट्स, आणि 19-इंच अलॉय व्हील्स असे आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
निर्मात्याच्या माहितीनुसार, MG M9 मध्ये 90 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही गाडी 548 किलोमीटर पर्यंतची रेंज देते. यात असलेल्या इलेक्ट्रिक मोटरमधून 245 PS ची पॉवर आणि 350 Nm टॉर्क निर्माण होतो. ही बॅटरी फास्ट चार्जिंगद्वारे फक्त 30 मिनिटांत 30% ते 80% पर्यंत चार्ज करता येते.
MG M9 ची भारतीय बाजारातील एक्स-शोरूम किंमत 69.90 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.






