Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Winter Tyre Pressure: हिवाळ्यात गाडीच्या टायरमध्ये किती हवा भरावी? ‘ही’ छोटी चूक पडू शकते महागात

Winter Tyre Pressure: हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे टायरमधील हवेचा दाब कमी होऊ शकतो. त्यामुळे टायर थोडे बसल्यासारखे दिसू शकतात. रिपोर्टनुसार, टायरमध्ये योग्य हवेचा दाब नसेल तर गाडीचा कंट्रोल, मायलेज आणि टायरची झीज यावर परिणाम होऊ शकतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 04, 2026 | 12:09 PM
Winter Tyre Pressure (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Winter Tyre Pressure (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हिवाळ्यातही कंपनीने सांगितलेला PSIच ठेवा; थंडीमुळे जास्त हवा भरू नका.
  • हवेचा दाब नेहमी थंड टायरमध्ये तपासा; ड्रायव्हरच्या दरवाजावरील स्टिकर किंवा मॅन्युअल पाहा.
  • टायरची हवा वारंवार कमी होत असल्यास पंक्चर किंवा व्हॉल्व्ह लीक तपासून घ्या.
 

थंडी सुरु झाली की गाडीच्या टायरमधली हवा कमी झाल्यासारखी वाटते. सकाळी गाडी काढली की टायर थोडे बसल्यासारखे दिसतात. हे का होतं आणि हिवाळ्यात टायरमध्ये किती हवा भरायची, हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. चुकीच्या हवेमुळे गाडीचा बॅलन्स बिघडतो, मायलेज कमी होतं आणि अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यासाठी थंडीत टायरची काळजी कशी घ्यावी ते समजून घेणं ते सुद्धा महत्त्वाचे आहे. Winter Tyre Pressure:

थंडीत टायरमधली हवा का कमी होते?

हा साधा विज्ञानाचा नियम आहे. तापमान कमी झालं की हवेचा दाब पण कमी होतो. उन्हाळ्यात टायरमध्ये 32 PSI हवा असेल तर थंडीत ती आपोआप 28-29 PSI पर्यंत खाली येते. म्हणून उन्हाळ्यात बरोबर वाटणारी हवा हिवाळ्यात कमी होते.काही गाड्यांच्या मॅन्युअलमध्ये लिहिलेलं असतं की प्रत्येक 7 डिग्री तापमान कमी झालं की 1 PSI हवा कमी होते. पण हे सगळ्या गाड्यांना लागू होत नाही. त्यामुळे अंदाजाने हवा भरू नका.

Car-Bike Insurance: कार-बाईकचा Insurance काढताय? आधी जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर Claim अडकू शकतो

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टायरच्या बाजूला जो PSI लिहिलेला असतो तो तुमच्या गाडीसाठीचा योग्य दाब नाही. तो त्या टायरचा जास्तीत जास्त दाब असतो. तुमच्या गाडीसाठी योग्य दाब किती आहे हे कंपनी ठरवते.

मग योग्य PSI कसा शोधायचा?

तुमच्या गाडीसाठी योग्य हवेचा दाब हा ड्रायव्हरच्या बाजूच्या दरवाजाच्या आत एका स्टिकरवर लिहिलेला असतो. तसेच गाडीच्या मॅन्युअलमध्ये पण तो दिलेला असतो. तिथेच बघून हवा भरायची असते.भारतामध्ये बहुतेक गाड्यांसाठी हा दाब 30 ते 35 PSI च्या मध्ये असतो. पण प्रत्येक गाडीचा दाब वेगळा असतो. पुढच्या आणि मागच्या टायरसाठी पण वेगळा दाब असू शकतो. म्हणून स्टिकरवर जे लिहिलंय तेच पाळा.

उदाहरणार्थ, जर तुमच्या गाडीसाठी कंपनीने 32 PSI सांगितला असेल तर हिवाळ्यात पण थंड टायरमध्ये 32 PSI च हवा असली पाहिजे. थंडी आहे म्हणून जास्त हवा भरायची गरज नाही. कंपनीने सांगितलं तेवढीच हवा ठेवा.

Best Electric Scooters: ऑक्टोबरमध्ये Electric Scooter घ्यायचीये? ‘या’ 5 दमदार e-Scooters वर टाका नजर, किंमत-रेंज जाणून घ्या

हवा कधी तपासावी?

टायरमधली हवा नेहमी टायर थंड असतानाच तपासावी. गरम टायरमध्ये हवा तपासली तर ती जास्त दाखवते.

थंड टायर म्हणजे काय?

तर गाडी कमीत कमी 3 तास एका जागी उभी असेल तर टायर थंड मानले जातात. NHTSA आणि मिशेलिन सारख्या मोठ्या कंपन्या पण हेच सांगतात की सकाळी गाडी चालवण्याआधीच हवा चेक करा.लांबच्या प्रवासाला जाण्याआधी चारही टायर आणि स्टेपनीतली हवा नक्की तपासा. प्रवासात पण मधून मधून चेक करत रहा.

कमी किंवा जास्त हवा भरल्याने काय नुकसान होतं?

टायरमध्ये हवा कमी असेल तर खूप प्रॉब्लेम होतात. गाडी चालवताना कंट्रोल बिघडतो, टायर जास्त गरम होतात, टायरची झीज एका बाजूने होते आणि पेट्रोल पण जास्त लागतं.आणि जर हवा जास्त भरली तर गाडी खूप उडते, खडबडीत रस्त्यावर त्रास होतो आणि टायर मधून जास्त झिजतो.म्हणून थंडी आहे म्हणून जास्त हवा भरायची ही चूक करू नका. फक्त कंपनीने सांगितलेला दाब ठेवा.जर तुमच्या गाडीच्या एकाच टायरमधली हवा सारखी सारखी कमी होत असेल तर ते नॉर्मल नाही. त्याला पंक्चर असेल किंवा व्हॉल्व्ह लीक असेल. अशा वेळी चांगल्या टायरवाल्याकडे जाऊन तपासून घ्या.थोडक्यात, हिवाळ्यात टायरकडे जरा जास्त लक्ष द्या. योग्य PSI हवा ठेवा आणि सुरक्षित ड्रायव्हिंग करा.

Web Title: Winter tyre pressure correct psi car tyres rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • best car
  • Marathi News
  • Winter Care

संबंधित बातम्या

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता
1

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता

Food Scam:भारतात नेस्लेच्या ‘लो-फॅट डेअरी व्हाईटनर’चा नमुना ‘असुरक्षित’? आढळला; नियामकाची माहिती.
2

Food Scam:भारतात नेस्लेच्या ‘लो-फॅट डेअरी व्हाईटनर’चा नमुना ‘असुरक्षित’? आढळला; नियामकाची माहिती.

World News :सोमालियाचा इशारा; इस्रायलशिवाय कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही, राष्ट्राध्यक्षांचा दावा
3

World News :सोमालियाचा इशारा; इस्रायलशिवाय कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही, राष्ट्राध्यक्षांचा दावा

National News : कॅप्टन स्मित मच्छार यांना मॅनकाइंड फार्माकडून १ कोटींचे बक्षीस; धैर्य आणि संयमाचा सन्मान
4

National News : कॅप्टन स्मित मच्छार यांना मॅनकाइंड फार्माकडून १ कोटींचे बक्षीस; धैर्य आणि संयमाचा सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.