Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री

यामाहा भारतात 250 cc ते 1000 cc सेगमेंटमध्ये पुन्हा मोठी एंट्री करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. R3 आणि MT-03 सोबत R7, Lander 250 आणि Tenere 700 पैकी कोणती बाइक आधी येणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 29, 2026 | 08:12 PM
यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री
Follow Us
Follow Us:
  • यामाहा भारतात 250 cc ते 1000 cc सेगमेंटमध्ये पुन्हा मोठ्या बाइक्स आणण्याचा विचार करत आहे.
  • R3 आणि MT-03 सोबत R7, Lander 250 आणि Tenere 700 वरही कंपनीचे लक्ष असू शकते.
  • भारतात लोकलायझेशन वाढल्यास यामाहाच्या प्रीमियम बाइक्सच्या किंमती अधिक स्पर्धात्मक होण्याची शक्यता आहे.
यामाहा भारतातील प्रीमियम मोटरसायकल मार्केटमध्ये पुन्हा मोठी तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनी 250 cc ते 1000 cc सेगमेंटमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याचा विचार करत आहे. यामुळे यामाहाच्या काही जुन्या मॉडेल्सची भारतात पुन्हा एंट्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. R3 आणि MT-03 सोबत R7, Lander 250 आणि Tenere 700 यांसारख्या बाइक्सवरही लक्ष असू शकते.

यामाहाने याआधी R3 आणि MT-03 भारतात CBU मार्गाने विकल्या होत्या. पण जास्त किंमतीमुळे या बाइक्सचे सेल्स अपेक्षेप्रमाणे झाले नाहीत आणि त्यानंतर त्यांची विक्री बंद करण्यात आली. R3 ची किंमत ₹4.65 लाख, तर MT-03 ची किंमत ₹4.60 लाख एक्स-शोरूम होती. आता कंपनीने भारतात उत्पादन किंवा लोकलायझेशन वाढवले, तर या बाइक्स जास्त स्पर्धात्मक किंमतीत आणण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Yamaha Tenere 900 ग्लोबल डेब्यू नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी येणार भारतात?

R3 मध्ये 321 cc पॅरलल-ट्विन इंजिन मिळते. हे इंजिन 42 PS पॉवर आणि सुमारे 29.5 Nm टॉर्क जनरेट करते. 6-स्पीड गिअरबॉक्स, 37 mm USD फोर्क आणि ड्युअल-चॅनल ABS यामुळे ही बाइक स्पोर्टी राइडिंगसाठी तयार करण्यात आली आहे. MT-03 मध्येही याच प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.

यामाहाने भारतात Lander 250 देखील सादर केली होती. ही बाइक ड्युअल-स्पोर्ट सेगमेंटमध्ये कंपनीची एंट्री मजबूत करू शकते. सध्या या सेगमेंटमध्ये Hero Xpulse 200 4V, Xpulse 210 आणि Kawasaki KLX230 सारख्या बाइक्स आहेत. त्यामुळे Lander 250 ला वेगळे स्थान मिळण्याची शक्यता आहे.

Yamaha R2 डीलरशिपमध्ये दाखल; लवकरच सुरू होणार या नव्या स्पोर्ट्सबाइकची डिलिव्हरी

प्रीमियम सेगमेंटमध्ये R7 आणि Tenere 700 हे आणखी 2 महत्त्वाचे ऑप्शन ठरू शकतात. R7 मध्ये 689 cc CP2 पॅरलल-ट्विन इंजिन असून ते 72.4 bhp पॉवर आणि 67 Nm टॉर्क देते. दुसरीकडे Tenere 700 यामाहाला मिडलवेट अॅडव्हेंचर सेगमेंटमध्ये मजबूत पर्याय देऊ शकते.

यामाहाच्या भारतातील R&D कॅपॅसिटी वाढवण्याच्या आणि इंडोनेशियाच्या तुलनेत एक्सपोर्ट कॅपॅसिटी वाढवण्याच्या योजनाही महत्त्वाच्या ठरतात. जर मोठ्या क्षमतेच्या बाइक्सचे उत्पादन भारतात झाले, तर CBU मॉडेल्सच्या तुलनेत किंमत कमी होण्याची शक्यता आहे. मात्र R3, MT-03, R7, Lander 250 किंवा Tenere 700 यांच्या भारतातील लाँचबाबत यामाहाने अद्याप ऑफीशली टाइमलाइन जाहीर केलेली नाही.

 

Web Title: Yamaha r3 r7 lander 250 tenere 700 india return auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Yamaha

संबंधित बातम्या

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
1

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक
2

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास
3

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ
4

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.