Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Year Ender 2025: Tata Sierra ते Maruti Victoris, या वर्षी लाँच झाल्या एकापेक्षा एक SUVs

यंदाच्या वर्षी अनेक दमदार एसयूव्ही लाँच झाल्या, ज्यांना ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. चला जाणून घेऊयात 2025 मध्ये कोणत्या नवीन SUV बाजारात आल्या.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 24, 2025 | 06:40 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • 2025 वर्ष SUVs ने गाजवलं
  • ग्राहकांनी SUVs ला दिला भरभरून प्रतिसाद
  • जाणून घ्या या वर्षी लाँच झालेल्या एसयूव्ही
2025 चे वर्ष भारतीय ऑटो बाजारासाठी खूप आशादायक ठरले. अनेक ऑटो कंपन्यांनी या वर्षी विविध सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर केल्या. यातही सर्वाधिक मागणी ही SUV सेगमेंटमधील वाहनांना होती. 2025 मध्ये अनेक उत्तम एसयूव्ही लाँच झाल्या. ग्राहकांनी देखील दमदार लूक आणि परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्हींना चांगला प्रतिसाद दिला. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, किया मोटर्स सारख्या कार उत्पादक कंपन्यांनी कोणत्या दमदार एसयूव्ही लाँच केल्या, त्याबद्दल जाणून घेऊयात.

2025 ह्युंदाई व्हेन्यू (2025 Hyundai Venue)

या कारची बऱ्याच काळापासून वाट पाहिली जात होती. कारप्रेमी देखील या कारच्या लाँचिंगची आतुरतेने वाट पाहत होते. कंपनीने व्हेन्यूला एका नवीन लूकसह सादर केले. कारचे एक्सटिरिअर आणि इंटिरिअर दोन्ही भाग बदलले आहेत. या कारच्या सुरवातीची किंमत 7.90 लाख पासून होते, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 15.51 लाख रुपये आहे. कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स समाविष्ट आहेत.

Tata Motors चा नाद नाही करायचा! ‘या’ कारमध्ये मिळेल Range-Rover मधील फीचर्स अन् 500 किमीपेक्षा जास्त रेंज

मारुती व्हिक्टोरिस (Maruti Victoris)

या वर्षी मारुतीची व्हिक्टोरिस देखील लाँच करण्यात आली. ही कार 10.50 लाखांच्या सुरवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली होती आणि याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 19.99 लाख रुपये आहे. या कारला अलिकडेच इंडियन कार ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आले. या कारमध्ये अनेक फीचर्स आहेत ज्यामुळे ती अल्पावधीतच ग्राहकांची आवडती एसयूव्ही ठरली.

टाटा सिएरा (Tata Sierra)

या कारची किंमत 11.49 लाखांपासून सुरू होते आणि टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत 21.49 लाखांपर्यंत जाते. या कारचे ईव्ही व्हर्जन देखील पुढील वर्षी लाँच केले जाणार आहे. या कारमध्ये अनेक फीचर्स आहेत. तसेच या कारला एका दिवसात 70000 हून अधिक बुकिंग मिळाली होती.

किआ सायरोस (Kia Syros)

या कारची किंमत 8.67 लाख रुपयांपासून सुरू होते आणि याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 15.94 लाख रुपयांपर्यंत जाते. या वर्षाच्या सुरुवातीला भारतात लाँच केलेली ही कार Kia Sonet च्या वर आणि Seltos च्या खाली आहे.

महिंद्रा XUV 7XO ची लॉन्च डेट जाहीर, ट्रिपल स्क्रीन आणि ADAS सह दमदार एन्ट्री

फोक्सवॅगन टिगुआन आर-लाइन (Volkswagen Tiguan R-Line)

ही कार प्रीमियम सेगमेंटमध्ये येते. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 45.73 लाख रुपये आहे. ही भारतीय बाजारात आयात केली जाते. या कारमध्ये नऊ एअरबॅग्ज आणि पॅनोरॅमिक सनरूफसह अनेक प्रीमियम फीचर्स आहेत.

स्कोडा कोडियाक (Skoda Kodiaq)

या कारची एक्स-शोरूम किंमत 39.99 लाख पासून सुरू होते आणि 45.96 लाखांपर्यंत जाते. या वर्षाच्या सुरुवातीला ऑटो एक्स्पोमध्ये ही कार प्रदर्शित करण्यात आली होती आणि नंतर ती लाँच करण्यात आली. यात नऊ एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा आणि पार्किंग असिस्ट यांचा समावेश आहे.

Web Title: Year ender 2025 best suv launch in 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 06:40 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • SUV

संबंधित बातम्या

Tata Motors चा नाद नाही करायचा! ‘या’ कारमध्ये मिळेल Range-Rover मधील फीचर्स अन् 500 किमीपेक्षा जास्त रेंज
1

Tata Motors चा नाद नाही करायचा! ‘या’ कारमध्ये मिळेल Range-Rover मधील फीचर्स अन् 500 किमीपेक्षा जास्त रेंज

हेल्मेट घालणं आता ओझं वाटणार नाही! ‘या’ ५ सोप्या पद्धतींनी मिळेल पूर्ण आराम आणि १००% सुरक्षा
2

हेल्मेट घालणं आता ओझं वाटणार नाही! ‘या’ ५ सोप्या पद्धतींनी मिळेल पूर्ण आराम आणि १००% सुरक्षा

Tata EV : स्वस्तात मस्त असणाऱ्या टाटा ईव्हीचा 2 लाख विक्रीचा टप्पा पार
3

Tata EV : स्वस्तात मस्त असणाऱ्या टाटा ईव्हीचा 2 लाख विक्रीचा टप्पा पार

TATA Electric Cycle लाँच? केवळ 4,499 रूपयात 250km रेंज; पर्यावरणासाठी उत्तम उपाय
4

TATA Electric Cycle लाँच? केवळ 4,499 रूपयात 250km रेंज; पर्यावरणासाठी उत्तम उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.