Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काही गाड्या थेट हृदयात उतरतात! ‘रॉयल एनफिल्ड बुलेट’ का बनली आहे भारतीय तरुणाईची क्रेझ?

आपल्या लष्करी वारशापासून सुरू झालेली रॉयल एनफिल्ड बुलेट ही तिच्या आयकॉनिक आवाजामुळे, सिनेमांतील 'स्वॅग'मुळे आणि आधुनिक रायडिंग कल्चरमुळे आज भारतीय तरुणाईसाठी केवळ एक मोटरसायकल नसून एक 'स्टेटस सिम्बॉल' आणि भावना बनली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 28, 2026 | 06:52 PM
काही गाड्या थेट हृदयात उतरतात! ‘रॉयल एनफिल्ड बुलेट’ का बनली आहे भारतीय तरुणाईची क्रेझ?
Follow Us
Follow Us:

भारतात गाड्या अनेक आहेत, पण ‘बुलेट’ची क्रेझ काही वेगळीच आहे. हो कि नाही? रस्त्यावरून जेव्हा एखादी बुलेट ‘डुग-डुग-डुग-डुग’ ‘ असा आवाज करत जाते, तेव्हा प्रत्येकाची नजर तिच्याकडे वळल्याशिवाय राहत नाही. रॉयल एनफिल्डची बुलेट ही आज केवळ एक मोटरसायकल राहिलेली नाही, तर ती भारतीय तरुणाईसाठी एक ‘स्टेटस सिम्बॉल’, रुबाब आणि एक भावना बनली आहे. जेन झीच्या भाषेत बुलेट चालवण्यात एक ‘ऑरा’ आहे म्हणायला हरकत नाही. पण सामान्य दुचाकी ते तरुणाईच्या मनातील क्रेझ, हा प्रवास कसा झाला हे इथे समजून घेऊयात,

लष्करी वारसा आणि जबरदस्त भक्कमपणा

बुलेटचा इतिहास खूप जुना आणि अभिमानास्पद आहे. १९५० च्या दशकात भारतीय सैन्याला सीमा रक्षणासाठी एका भक्कम गाडीची गरज होती, तेव्हा ‘रॉयल एनफिल्ड बुलेट ३५०’ ची निवड करण्यात आली. सैन्यात वापरली जाणारी गाडी म्हटल्यावर तिच्या ताकदीबद्दल आणि भक्कमपणाबद्दल तरुणांच्या मनात एक वेगळाच आदर निर्माण झाला. डोंगराळ भाग असो वा खडतर रस्ते, बुलेट कधीच मागे हटली नाही. हाच रांगडापणा तरुणांना आकर्षित करून गेला.

Royal Enfield आणतेय नवीन Himalayan 440, जाणून घ्या खास वैशिष्ट्य आणि पॉवर

बुलेटचा आयकॉनिक ‘डुग-डुग‘ आवाज

बुलेटचा सर्वात मोठा युनिक सेलिंग पॉईंट म्हणजे तिचा आवाज! तो भारदस्त ‘थम्प’ म्हणजेच ‘डुग-डुग’ आवाज ऐकूनच तरुणांचे हृदय जणू धडकते. तिचा विंटेज, मेटल बॉडी लूक आणि रेट्रो डिझाईन आजही बाजारातील इतर फायबर-बॉडी गाड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी ठरते. बुलेट चालवताना मिळणारा ‘किंग साईझ’ फील तरुणांच्या आत्मविश्वासाला आणि ‘स्वॅग’ला एक वेगळीच उंची देतो.

 सिनेमा कल्चर आणि ‘स्वॅग‘ वाली रॉयल एन्फिल्ड

भारतीय चित्रपटसृष्टीने बुलेटची क्रेझ वाढवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. दक्षिणात्य चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत, पडद्यावरचा नायक जेव्हा बुलेटवर एन्ट्री घेतो, तेव्हा थिएटर्समध्ये शिट्ट्या वाजतात. खऱ्या आयुष्यातही कॉलेजचे तरुण असोत की नोकरी करणारे व्यावसायिक, बुलेट खरेदी करणे म्हणजे आयुष्यात काहीतरी मोठे यश मिळवल्यासारखे मानले जाते.

क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स

 ‘रायडिंग कल्चर‘ आणि आधुनिक रूप

कंपनीने काळाची पावले ओळखून जुन्या वारशाला आधुनिक तंत्रज्ञानाची (उदा. सेल्फ स्टार्ट, उत्तम ब्रेक्स) जोड दिली. ‘क्लासिक ३५०’ किंवा ‘मेटेओर’ सारख्या मॉडेल्सनी तरुणांना वेड लावले. तसेच, रॉयल एनफिल्डने केवळ गाड्या विकल्या नाहीत, तर ‘रायडिंग कल्चर’ निर्माण केले. गाडीच्या बरोबरच त्यांनी दमदारपणाची आणि स्वॅगवाली भावना विकली. ‘लडाख ट्रिप’ किंवा ‘रायडर मॅनिया’ सारख्या ग्रुप ट्रिप्समुळे बुलेट चालवणे ही एक जीवनशैली बनली आहे.

आजच्या हाय-टेक युगातही बुलेटने आपले क्लासिक रूप टिकवून ठेवले आहे, म्हणूनच ती आजही भारतातील करोडो तरुणांच्या मनावर राज्य करत आहे.

Web Title: Youths craze for royal enfield bike auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

थारप्रेमींसाठी क्रेझी बातमी! Mahindra Thar Facelift, Vision.S आणि BE.07 लवकरच येणार मार्केटमध्ये! पाहा डिटेलमध्ये माहिती
1

थारप्रेमींसाठी क्रेझी बातमी! Mahindra Thar Facelift, Vision.S आणि BE.07 लवकरच येणार मार्केटमध्ये! पाहा डिटेलमध्ये माहिती

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स
2

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम
3

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?
4

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.