Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कनवाळू तरीही खंबीर, हिंमतवान सहकारी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विधानसभेतील आमचे जुने सहकारी आणि परममित्र एकनाथ शिंदे यांचा आज जन्मदिवस आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचा उत्साह, त्यांचे शारीरिक आणि मानसिक शक्ति 30 वर्षाच्या तरूणाला देखील मागे टाकू शकते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 09, 2023 | 06:30 AM
कनवाळू तरीही खंबीर, हिंमतवान सहकारी
Follow Us
Follow Us:

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विधानसभेतील आमचे जुने सहकारी आणि परममित्र एकनाथ शिंदे यांचा आज जन्मदिवस आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचा उत्साह, त्यांचे शारीरिक आणि मानसिक शक्ति 30 वर्षाच्या तरूणाला देखील मागे टाकू शकते.

राज्यातील जनता प्रश्न विचारत असतात मुख्यमंत्री नेमकं झोपतात कधी? हाच प्रश्न आमच्या मनात देखील येतो. आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या दरम्यान मुख्यमंत्री कार्यालय किंवा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी लाईट नेहमी बंद असायची. पण आता इथं 24 तास लाईट सुरुच असते. नाटककार विजय तेंडुलकर यांचे एक नाटक आहे, त्याचं नाव ‘यह सब कहाँ से आता है?’ त्यामुळे आता माझ्याही मनात प्रश्न येतो की अखेर एवढी ऊर्जा व आत्मशक्ती नेमकी येते तरी कुठून? आम्ही आमच्या स्तरावर याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून हे समजले की, एकनाथ संभाजी शिंदे व्यक्तिमत्त्वात त्यांच्या दोन नेत्यांवरील श्रद्धेचा परिणाम आहे. त्या श्रद्धेच्या जोरावर त्यांनी इथपर्यंत प्रवास केला आहे.

सातारा जिल्ह्यातील दरे गावातील मूळ रहिवासी असलेल्या एकनाथ राव यांचे वडील संभाजी शिंदे कामानिमित्त मुंबईला आले होते. संभाजी शिंदे यांना ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील खोका कंपनीत नोकरी मिळाली होती. त्यांना चार मुले आहेत. ज्यामध्ये सर्वात मोठे एकनाथ शिंदे हे आहेत. घरात आर्थिक अडचण, महापालिकेच्या शाळेत शिक्षण त्यांनी घेतले. त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची उमेदही होती.

मी एकनाथ शिंदे यांना 2004 पासून सभागृहात सहकारी म्हणून पाहत आहे, ओळखत आहे. मंत्रिपद आणि मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर देखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जराही अहंकार पाहिला मिळत नाही. एकनाथ शिंदे यांच्याबाबत मी एक गोष्ट अनुभवली ती म्हणजे त्यांचा शांत स्वभाव आणि कोणाच्याही आनंदात स्वत:चा आनंद मानण्याची क्षमता आहे. जर कोणताही आमदार (माझ्यासह) त्यांच्याजवळ काम घेऊन जातो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्वागतार्ह असे भाव असतात. जरी ते थकलेले असले तरीदेखील त्यांचा थकवा कधीही बोलताना जाणवला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंदच जाणवतो.

– सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते

Web Title: Bjp leader sudhir mungantiwar writes article on occasion of cm eknath shinde birthday nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2023 | 06:30 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Eknath Shinde Birthday
  • maharashtra
  • sanjay rathod
  • Sudhir Mungantiwar

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.