Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाबाद चार नाटके!

व्यावसायिक नाटकांच्या गर्दीमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं तस महाकठीणच, पण यातही आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या चार नाटकांनी इतिहास घडविला आहे. काळ बदलला, अभिरुची बदलली पण तरीही या नाटकांनी आपले वेगळेपण जपलं आहे. पिढ्यान् पिढ्यांना या नाटकांनी भूरळ पाडली आहे. विनोदाच्या महापुरातही ही नाटके आज नव्या दमात आपलं वैशिष्ट जपून आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 08, 2023 | 06:00 AM
नाबाद चार नाटके!
Follow Us
Follow Us:

पु. ल. देशपांडे यांचे ‘एक झुंज वाऱ्याशी’, महेश एलकुंचवार यांचे ‘वाडा चिरेबंदी’, प्रशांत दळवी याचे ‘चारचौघी’, डॉ. मीना नेरुरकर यांचे ‘अवघा रंग एकचि झाला’ ही चार नाटके रसिकांची अभिरुची बदलली असे गृहित जरी धरले तरीही पुन्हा-पुन्हा नव्या संचात नव्या आकृतिबंधात प्रगटत आहेत. या संहितांमध्ये असलेली जादू ही आजही संपलेली नाही. आजोबांनी ऐकेकाळी बघितलेलं नाटक आज त्यांचा नातू तितक्याच गंभीरपणे बघतोय. याचा अर्थ आजही त्यातला विषय – आशय हा कालबाह्य झालेला नाही. जो नव्या पिढीच्या रसिकांना खुणावतो आहे.

आज करमणूकप्रधान नाटकांची ‘चलती’ असल्याने निर्मातेही त्याच प्रकारच्या नाटकांची मागणी करतात. ‘मागणी तसा पुरवठा’ हा कुठल्याही धंद्यातला पहिला नियमच आहे. पण काहीशा गंभीर, वैचारिक, नाटकांकडे मराठी रंगभूमीने पूर्णपणे पाठ फिरविलेली नाही. ‘कॉमेडी’च्या महासागरातही काही दर्जेदार नाटकेही पुन्हा-पुन्हा रंगभूमीवर आली आहेत. त्यामुळे ‘नाटक म्हणजे निव्वळ करमणूक’ ही नवी व्याख्या काही प्रमाणात का होईना पुसली जात आहे . ‘जुनं ते सोनं’ असही म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही.

पु. ल. देशपांडे यांचे ‘एक झुंज वाऱ्याशी’ हे नाटक. आज पुन्हा एकदा नव्या रंगकर्मींनी एक आव्हान म्हणून रंगभूमीवर आणलं आहे. १९८८ च्या सुमारास प्रथम हे नाट्य रसिकांनी अनुभवलं. ‘द लास्ट अपॉईंटमेट’ हे रशियन लेखकांच्या नाटकावर पुलंनी रूपांतर केलय. नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्सच्या एक प्रकल्पाचा भाग म्हणून त्याची निर्मिती झाली होती‌. प्रा. वामन केंद्रे यांनी दिग्दर्शन केलं आणि दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, सयाजी शिंदे, गौरी केंद्रे यांच्या त्यात भूमिका होत्या. चार पात्रांभोवती नाट्य ताकदीने गुंफलेलं. पुलंचा परिसस्पर्श त्याला झालेला. त्यावेळी चिमणराव, वासूची सासू, वटवट सावित्री, पळा पळा कोण पुढे पळे तो या विनोदी नाटकांमुळे दिलीप प्रभावळकर यांची ‘विनोदी कलाकार’ अशी इमेज तयार झालेली, पण या नाटकातला माणूस उर्फ कॉमनमॅन हा तसा गंभीर प्रवृत्तीचा. पण एक वैशिष्ट्यपूर्ण भूमिका म्हणून ती प्रभावळकर यांनी स्वीकारली. आणि त्याचे सोने केले. एका मुलाखतीत प्रभावळकर म्हणाले होते‌ – ‘या नाटकापूर्वी जवळजवळ वीसएक वर्षे अभिनय करूनसुद्धा नव्याने या नाटकातून मला बरच काही शिकायला मिळालं!’ यातच सारंकाही आलय. खूद्द पुलं देशपांडेही याच्या तालमींना हजेरी लावल्याच्या आठवणी आहेत.

नव्याने आलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन आणि कॉमनमॅनची प्रमुख भूमिका ही प्रायोगिक रंगभूमीवरील रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांनी केलीय. तर आशुतोष घोरपडे, शोभना मयेकर आणि सुगत उथळे यांच्या यात भूमिका आहेत. व्हिजन आणि सुप्रिया प्रॉडक्शनची ही निर्मिती आहे. एका उपमंत्र्याच्या केबिनमध्ये त्याच्या राजीनाम्याची मागणी करणारा माणूस आणि दुसऱ्याच्या अन्यायावर जाब विचारणारा कॉमनमॅन यात नजरेत भरतो. यातील आशय हा ताकदीचा आहे. मूळ रशियन संहिता असली तरी ती आपल्या जवळची वाटते. हे श्रेय नाटककारांचे आहे. या नाटकाचेही प्रयोग सुरू आहेतच. जुनं, गंभीर नाटक म्हणून याची निर्मिती ही कालबाह्य झालेली नाही. हे महत्वाचे!

महेश एलकुंचवार यांचे ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक १९८५ साली रंगभूमीवर आले. तो काळ स्वातंत्र्यानंतरचा. गावोगावतले वाडे हे पडद्याआड जात होते. काही कुटुंब त्यात उद्ध्वस्त‌ होत होती. चार पिढ्यातील कौटुंबिक नाते संबंध हे पुसट होतांना ‘वाडा’ सारंकाही मुकपणे बघत होता. एक जीवघेणी घुसमट त्यात होती. वाड्याचे कोसळणे हे एका महानाट्याचा विषय ठरला. कल्पक- प्रायोगिक नाटककार महेश एलकुंचवार यांनी यातील कौटुंबिक नाट्य नेमके पकडले आणि संहिता ताकदीने उभी केली. हे नाट्य म्हणजे कोसळत्या भग्नावस्थेचे एक थरारक प्रतीक ठरले. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत – अशी तिन नाटकांची मालिकाच त्यातून जन्माला आली. ‘त्रिनाट्यधारा’ हा विलक्षण असा अनुभव, रसिकांनी घेतला. एक सशक्त संहिता आणि त्याभोवतीचे कथानक, उपकथानक किती नाट्यपूर्ण ताकदीचे असते याचेच दर्शन १९८५ पासून रसिकांना होत आहे.

‘वाडा चिरेबंदी’ नाटकाने तसा इतिहासच रचला. व्यावसायिक रंगभूमीवर प्रथमच ९ तासांचा सलग नाट्यानुभव चार मध्यंतरासह झाला. दुपारी १ वाजता वाडा चिरेबंदी, सायं‌ ५ वाजता मग्न तळ्याखाली आणि रात्री ९.३० वाजता युगांत ! – असे हे तिनप्रयोग झाले. जिगीषा आणि अष्टविनायक या नाट्यसंस्थेची ही निर्मिती आणि चंद्रकांत कुलकर्णी याचे दिग्दर्शन होते. एक सलग असा महानाट्यअनुभव या त्रिनाट्यधाराने दिलाय. ज्याची नोंद ही जागतिक रंगभूमीच्या इतिहासात सन्मानाने घेतली जातेय. एक सामाजिक व सांस्कृतिक दर्शनच यातून झालय. आज चक्क ३८ वर्षे उलटली. तरी हे नाट्य बाद ठरलेले नाही. २०२३ या वर्षात निवेदिता सराफ, आसावरी घोटीकर, पोर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, धनंजय सरदेशपांडे, विनिता शिंदे, सिमरन सैद, आणि वैभव मांगले हे कलाकार हा ‘वाडा’ रसिकांपूढे ताकदीने पेश करीत आहेत.

मुळचे पत्रकार असलेले आणि नाटकांबद्दल जाण असलेला नाटककार प्रशांत दळवी याची ‘चारचौघी’ ही संहिता. याचा शुभारंभी प्रयोग १५ ऑगस्ट १९९१ या दिवशी पुण्यात श्रीचिंतामणीच्या लताबाई नार्वेकर यांनी सादर केला. चंद्रकांत कुलकर्णीचे दिग्दर्शन. नाटककार – दिग्दर्शक दोघे पक्के दोस्त. तरुणाईत त्यांनी एका गंभीर विषयाला हात घातल. दीपा श्रीराम (आई), वंदना गुप्ते (विद्या), आसावरी जोशी (वैजू), प्रतीक्षा लोणकर (विनी), प्रबोध कुलकर्णी (श्रीकांत), मिलींद सफाई (प्रकाश) आणि सुनील बर्वे – वीरेनच्या भूमिकेत होते. एका मंध्यतरानंतर पुन्हा एकदा या नाटकाचा डाव मांडण्यात आलाय. प्रयोग सुसाट सुरु झालेत. नव्या संचातला शुभारंभ हा १७ सप्टेम्बर २०२२ या दिवशी ‘जिगीषा’ या नाट्यसंस्थेतर्फे झाला. यात रोहिणी हट्टंगडी (आई), मुक्ता बर्वे (विद्या), कादंबरी कदम (वैजू), पर्ण पेठे (विनी), निनाद लिमये (श्रीकांत), श्रेयस राजे (प्रकाश), पार्थ केतकर (वीरेन) यांच्या भूमिका आहेत. या नाटकाचा प्रवास म्हणजे चक्क तीन दशकांचा प्रवाह आहे. त्यातला विषय हा आजही आजचा वाटतो. यातच यातील विषयाचे महत्व अधोरेखित होते.

‘ज्येष्ठ नाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे यांनी ‘चारचौघी’ नाटकावरल्या एका ग्रंथाचे संपादन करताना म्हटले होते की, ‘नव्या चारचौघी’ नाटकाचे यश हे जरी एकीकडे सुखावणारे असले तरीही समाज आजही बदललेला नाही. आपण ३१ वर्षापूर्वी जिथे होतो तिथेच आहोत!’ हे खूप काही सांगून जाणारं आहे. एकूणच स्त्रीयांच्या भावविश्वात घेऊन जाणारं त्यांचे प्रश्न मांडणारं हे नाट्य. जे मराठी रंगभूमीच्या इतिहासात मैलाचे निशाण ठरलय. म्हणूनच आजही दिग्गज कलाकारांनी त्यात आपली हजेरी लावलीय. सारे ‘बिझी’ स्टार असूनही या नाटकाशी नातेसंबंध ठेवलय. डोळ्यात अंजन घालणारे आणि काळावर मात करणारे हे नाट्य असल्याचे खरे आहे.

मराठी रंगभू‌मी ही संगीत नाटकांशिवाय पूर्ण होणार नाही. पण गाण्यांच्या अतिरेकामुळे ही रंगभूमी दोन पावले दूर झाली हे मानावेच लागेल. पण तरीही संगीत रंगभूमीने सुवर्णकाळ अनुभवला एका पिढीला भारावून सोडले. दरवर्षी एखादं तरी संगीत नाटक हे रंगभूमीवर अवतरतेच! यंदा देवबाभळीने हा वारसा पुढे चालविला आहे. २०१८ पासून त्याचे प्रयोग सुरु आहेत. आता समारोपाचा क्षण जवळ आलाय. आणखीन एक संगीत नाटक जे २०१३ या वर्षापर्यंत त्याने चक्क ३०० प्रयोगांचा विक्रम केला. ‘हाऊसफुल्ल’ची पाटी, सन्मानाने मिरविली ते नाटक म्हणजे डॉ. मीना नेरूरकर यांचे ‘अवघा रंग एकचि झाला!’

पंधरा एक वर्षाचा कालावधी लोटला. परदेशात स्थायिक झालेल्या डॉ. मीना नेरूरकर यांच्या लेखणीतून साकार झालेला हा ‘अवघा रंग!’ जो रंगमंचावरही इंद्रधनुष्य ठरलाय. याचे शुभारंभी प्रयोग हे प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदेने दिमाखात केले होते. पंतांचे पुतणे अनंत पणशीकर हे निर्माते बनले. दिग्दर्शनाची जबाबदारी ही अशोक समेळांकडे होती. रघुनंदन पणशीकर यांनी संगीत साज चढविला. प्रसाद सावकार (किर्तनकार अप्पा), जान्हवी पणशीकर (पत्नी), स्वरांगी मराठे (जेनी), आणि अमोल बावडेकर (सोपान) बनलेले होते. प्रयोगाला महाराष्ट्रभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. २०२३ या वर्षात हे नाट्य पून्हा एकदा रसिकांपुढे आत्मन आणि भूमिका थिएटर्स तर्फे रंगभूमीवर आलय. ज्यात लेखनासोबतच दिग्दर्शनाचीही जबाबदारी डॉ. मीना नेरुरकर यांनी हाती घेतलीय. नव्या संचात किर्तनकार वेलणकर बनले प्रमोद पवार, जेनीच्या भूमिकेत श्रध्दा वैद्य, आई- अपर्णा अपराजित- गौरी सुखटणकर (मुक्ता), गौतम मुर्डेश्वर (नानासाहेब), ओमकार प्रभुधाटे (सोपान). एकूणच नव्या दमदार रंगकर्मींनी पुन्हा एकदा हे नाटक पेललं आहे. संगीतावरचं भाष्य करणारं हे नाटक. ज्यातील कथानकाच वेगळेपण हे दोन पिढ्यांना भारावून सोडते. नाबाद ठरलेल्या या चार विजेत्या नाटकांना सलाम!

– संजय डहाळे

sanjaydahale33@gmail.com

Web Title: Four unbeaten plays nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात तयार होणार इटालियन बाईक! Moto Guzzi Trip 500 सादर, Aprilia 457 चे इंजिन मिळणार
1

महाराष्ट्रात तयार होणार इटालियन बाईक! Moto Guzzi Trip 500 सादर, Aprilia 457 चे इंजिन मिळणार

Navarashtra Impact: ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्याला यश! आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक अतिक्रमणांवर नगरपरिषदेची कारवाई
2

Navarashtra Impact: ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्याला यश! आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक अतिक्रमणांवर नगरपरिषदेची कारवाई

La Nina Effect: आता हे काय नवीन! तुफान पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता; एल निनोनंतर ला निनाचे संकट
3

La Nina Effect: आता हे काय नवीन! तुफान पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता; एल निनोनंतर ला निनाचे संकट

अनावश्यक खर्चाला कात्री लावा, 10 दिवसांत बचतीचा अहवाल द्या; अभिषेक बारणे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश
4

अनावश्यक खर्चाला कात्री लावा, 10 दिवसांत बचतीचा अहवाल द्या; अभिषेक बारणे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.